News

शेतीमालाच्या निर्यातीसाठी प्रमाण असणे गरजेचे आहे, तरच त्याच्या मागणीत आणि निर्यातीत वाढ होणार आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत्या कीटकनाशकामुळे बासमती तांदूळ निर्यातीवर परिणाम झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र आता कृषी शास्त्रज्ञानी असा यावर पर्याय काढला आहे की भविष्यात कीटकनाशकाची गरजच भासणार नाही. पुसा येथील भारतीय कृषी संशोधन समितीने पिकावर रोगराई होणार नाही अशा ३ जाती विकसित केल्या आहेत. सध्या बाजारात रसायनमुक्त पिकाला मोठी मागणी आहे. याच पद्धतीने बासमती तांदूळ राहणार आहे. बासमती तांदूळ निर्यातीत वाढ होणार आहे. पुसा संस्थेमध्ये बासमती तांदळावर सर्वात जास्त काम केले जाते. बासमती 1509 व 1847 या वानामध्ये सुधारणा केली असून 1886 हा नवीन वाण तयार केला आहे. हे तिन्ही वाण रोग्यप्रतिबंधनकारक असल्याने यास कीटकनाशकाची गरज भासणार नाही असे डॉ. रितेश शर्मा यांनी सांगितले आहे.

Updated on 06 April, 2022 1:50 PM IST

नवीन वाण कोणत्या रोगांपासून मुक्त आहेत?

कृषी तज्ञ डॉ. शर्मा यांनी सांगितले की पुसा बासमतीच्या तीन वाणाच्या जातीमध्ये जिवाणू झोलसा सापडणार नाही. त्यामुळे बासमती  तांदळाला फुगीर किंवा  ब्लास्ट रोग होणार नाही. जर ब्लास्ट रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लेझोलची भर पडली तर तांदूळ निर्यातीत अडचणी निर्माण होणार आहेत. मात्र आता ही समस्या मिटली आहे. या नव्याने  तयार  झालेल्या  वाणामुळे निर्यात देखील वाढलेली आहे.

बासमती तांदळाला ‘या’ रोगाची संभावना :-

अनेक प्रकारचे तांदूळ आहेत मात्र बासमती तांदूळ हा एक वेगळाच ब्रँड आहे. मात्र तेवढ्याच प्रमाणत पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव देखील आहे. जे की या रोगाची टाळाटाळ करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतो. तरी पानांमध्ये डोळ्यासारखे डाग दिसतात. या डागांची वाढ होते आणि पाने जळून जातात. तसेच म्यान ब्लाईट नावाचा आजार देखील होतो जो आजार झाल्याने खोडामध्ये चॉकलेटी रंगाचे डाग तयार होतात. हे डाग वाढतच चालले की उत्पादनावर परिणाम होतो.

कीटकनाशकाची पातळी ही ठरलेलीच :-

पिकांच्या किटकनाशकाची पातळी ही ठरलेली आहे. सरकारने सांगितले आहे की अशा परिस्थितीत कीटकनाशकाचा कमी वापर करणे गरजचे आहे. जर कीटकनाशकाचे प्रमाण अधिक असले तर तांदळाच्या दर्जावर थेट परिणाम होतो. भविष्यात याचमुळे तांदळाच्या गुणवत्तावर परिणाम होणार असल्याचे सरकार सांगत आहे. बासमती तांदळाची निर्यात भारतामधून दरवर्षी ३२ हजार कोटी रुपयांची होती.

बासमती तांदळामध्ये नेमकी अडचण काय?

कृषी तज्ञांचे असे मत आहे की युरोपियन युनियन ऑडिट रिपोर्टमध्ये बासमती तांदळात १९.९ टक्के किटकनाशकाचे प्रमाण आहे. तर १ हजार १२८ तांदळाच्या नमुन्यांपैकी ४५ नमुण्यात कीटकनाशकांचे अधिक प्रमाण दिसून आले आहे. त्यामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होतो. मात्र नव्याने तयार केले असलेल्या वानांमुळे सरकार आणि शेतकरी या दोघांचा मार्ग सुद्धा सोपा झालेला आहे.

English Summary: Agricultural scientists have started research, now the barrier to basmati exports has been removed
Published on: 06 April 2022, 01:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)