News

शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरून (With a touch of modernity) शेती करायला सुरुवात केली आहे. शेतकरी बांधव उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत, यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते खरी मात्र यामुळे जमिनीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. त्यामुळे आता चक्क कृषी विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर टाळण्याचे (To avoid unrestricted use of chemical fertilizers) आवाहन केले आहे, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी शेतकरी बांधवांनी हिरवळीचे खते, सेंद्रिय खते, कंपोस्ट खते, शेणखत इत्यादी जैविक खतांचा वापर केल्याने उत्पादनात भरीव वाढ देखील होईल शिवाय यामुळे जमिनीचा पोत देखील सुधारेल.

Updated on 02 January, 2022 6:50 PM IST

याबरोबरच शेतकरी बांधवांनी खत व्यवस्थापन करताना वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे तसेच पिकांची व्यवस्थित निगा घेतल्यास देखील पिकांचे उत्पादन वाढते. त्यामुळे फक्त रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करून उत्पादन प्राप्त होते अशा गैरसमजात शेतकरी बांधवांनी राहू नये, पिक जोपासताना किशोर शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन ठेवले, व्यवस्थित रित्या जैविक खतांचे व्यवस्थापन केलं, तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल शिवाय रासायनिक खतावर होणारा हजारोंचा खर्च देखील शेतकरी बांधवांचा यामुळे वाचून जाईल.

पिकातून जास्तीचे उत्पादन प्राप्त करण्यासाठी सध्या रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर बघायला मिळत आहे, त्यामुळे शेत जमिनीचा पोत कमालीचा ढासळताना दिसत आहे. मातीचे आरोग्य बिघडल्यामुळे पिकाच्या उत्पादनात कमालीची घट देखील आता दिसायला लागली आहे. त्यामुळे आता कृषी वैज्ञानिक (Agricultural Scientist) देखील शेतकऱ्यांना गरजेनुसार खत वापरण्याची शिफारस करताना दिसत आहेत. रासायनिक खतांचा वापर पूर्णतः बंद न करता त्याच्या अनिर्बंध वापरावर लगाम लावणे अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनी पिकाच्या लागवडी पुर्वी माती परीक्षण करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक तेच घटक योग्य प्रमाणात खताच्या स्वरूपात जमिनीत टाकल्यास मातीचा दर्जाही खालवणार नाही, शिवाय यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच जमिनीत असलेले मूलद्रव्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी जैविक शेती करणे ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी जैविक खतांचा वापर करावा असा सल्ला यावेळी कृषि विभागांकडून (From the Department of Agriculture) देण्यात आला आहे. जैविक पद्धतीने शेती केल्यास शेतीच्या आरोग्यही अबाधित राहील शिवाय यामुळे उत्पादन वाढेल तसेच मानवाचे आरोग्य देखील यामुळे नक्कीच सुधारेल. एकंदरीत रासायनिक खतांचा नियमित वापर व जैविक खतांच्या वापराला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.

English Summary: agricultural scientist give advice to farmers that dont use unlimited chemical fertilizer
Published on: 02 January 2022, 06:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)