News

कृषी क्षेत्रासाठी चांगले दिवस येत आहेत. काही काळापासून कृषीती उत्पन्न वाढत आहे. या उत्पन्नामुळे देशाच्या जीडीपीत कृषी क्षेत्र मोठी भुमिका निभावत आहे.

Updated on 11 September, 2020 7:49 PM IST

कृषी क्षेत्रासाठी चांगले दिवस येत आहेत. काही काळापासून कृषीती उत्पन्न वाढत आहे. या उत्पन्नामुळे देशाच्या जीडीपीत कृषी क्षेत्र मोठी भुमिका निभावत आहे.  दरम्यान आरबीआयच्या एका अहवालानुसार, कृषी उत्पादनात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कृषी उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या मिळकत वाढणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु गोळा बेरीज केली तर मोदी सरकारचे हे स्वप्न अजून दूर असल्याचे दिसत आहे.

एनएसएसओच्या आकड्याशी जुळवणी केल्यानंतर या सत्याची प्रचिती होते. दरम्यान आरबीआयच्या अहवालानुसार, देशातील विपरित परिस्थिती असूनही  कृषी उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. २०१७-१८ मध्ये दोन हजार ८५० लाख टन कृषी उत्पादन झाले होते. तर २०१८-१९ मध्येही हाच आकडा स्थिर होता. परंतु २०१९-२० मध्ये यात ४ टक्क्यांची वाढ झाली असून हे उत्पादन २ हजार ९६७ लाख टन झाले आहे. यात धान्य, कडधान्य आणि तेलबिया असून त्याचे उत्पादन दोन वर्षात ११७ लाख टन झाले आहे. देशातील फलोत्पादनात यात भाजीपाला आणि फळे येतात यातही वाढ नोंदविण्यात आली आहे.

आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, देशातील फलोत्पादन  २०१७-१८ ते २०१९-२० च्या दरम्यान दोन वर्षात २.८१ टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत एक वर्षात हे उत्पादन ३ टक्क्यांनी वाढले. मागील दोन वर्षात हॉर्टिकल्चरच्या उत्पादनात ९३ लाख टनापेक्षा जास्त झाला. दरम्यान केंद्र सरकारच्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गेनाइजेशन म्हणजेच एनएसएसओच्या नुसार, ०.१ हेक्टरपेक्षा कमी  जमीनवाले शेतकरी अजूनही महिन्याला ७ हजार ३०० रुपयांची कमाई करत आहेत.

 


तर ज्या शेतकऱ्यांकडे  एक ते दोन हेक्टर जमीन आहे त्यांच्या कुटुंबाची मिळकतही ११ हजार ८१० रुपये आहे. याचबरोबर ४ ते १० हेक्टर जमीन धारकांची मिळकत ही ३१ हजार ५६०  रुपये आहे.  यानुसार शेतकरी कुटुंबाची कमाई फक्त ४ हजार रुपयांननी वाढली आहे. दरम्यान  केंद्र सरकार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत शेतकरी सन्मान निधीतून करत असते, ही शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या ६ टक्के आहे.

English Summary: Agricultural production has increased by 4 per cent this year, But less in income
Published on: 11 September 2020, 07:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)