News

अहमदनगर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, पंचनामे करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील चिलेखनवाडी या ठिकाणी उघडकीस आला होता. याबाबत आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Updated on 02 November, 2022 2:22 PM IST

अहमदनगर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, पंचनामे करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील चिलेखनवाडी या ठिकाणी उघडकीस आला होता. याबाबत आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तालुक्यातील चिलेखनवाडी, देवसडे येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्याप्रकरणी चिलेखनवाडी कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे व ग्रामसेवक कविता भास्कर शिंदे तसेच कर्मचारी संजय देवराम इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

PM Kisan : नाराज होऊ नका, फक्त हे काम करा, 30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात येतील 2000 रुपये

नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे सध्या कृषी विभागामार्फत सुरू आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शासनाचे अधिकारी अधिकारी खासगी लोकांना (एजंट) शेतातून शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी पाठवत आहेत. हे खासगी लोक पंचनामा करण्यासाठी एकरी 200 ते 400 रुपयांची मागणी करत होते.

त्याशिवाय ते पंचनामा करत नाहीत, असे स्पष्ट करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना करण्यात आली. ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाने कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे, ग्रामसेवक कविता भास्कर शिंदे व ग्रामपंचायत कर्मचारी संजय इंगळे यांना निलंबित केले आहे.

EPFO पेन्शनधारक सावध! निवृत्तीनंतरचे पैसे काढण्यावर आला हा नवा नियम

राज्याच्या कृषी सहसंचालकांनी कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी दिली.

चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक कविता भास्कर शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी दिली. ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवराम इंगळे यांच्या निलंबनाचे आदेश चिलेखनवाडीच्या सरपंचानी काढल्याचे सांगण्यात आले.

शिंदे-फडणवीस सरकारला लाज वाटली पाहीजे, राजू शेट्टींची घणाघाती टीका

English Summary: Agricultural Assistant, Village Sevak suspended for demanding money for panchanama
Published on: 02 November 2022, 02:22 IST