भारतातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता देशातील छोट्या व्यापारांना फेसबूक 50 लाख रुपयांपर्यंत लोन देणार आहे.यासाठी फेसबुकने इंडीफी कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, अवघ्या पाच दिवसाच्या आत या लोनचा पैसा तुमच्या खात्यात येऊ शकतो. म्हणजेच कमी वेळा तुम्हाला लोन उपलब्ध होऊ शकते. तसेच घेतलेल्या या कर्जावर व्याजा मध्येसुद्धा सवलत दिली जाईल.

फेसबुकच्या या उपक्रमाद्वारे देशातील लाखो छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे व त्यासोबत व्यापाऱ्यांना आपला व्यापार वाढविण्यासाठी मदत मिळेल. या योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा होऊ शकतो.. तुझ्यासारखी शेतकरी स्वतःच्या एखादा प्रॉडक्ट तयार करून बाजारात विकू शकतात व आपला व्यवसाय उभारू शकतात.योजना स्वतंत्र कर्जदाता पार्टनर्स इंडिफी द्वारे चालवली जाणार आहे.योजना देशातील 200 शहरासाठी सुरू करण्यात आली आहे.
फेसबुक ने पहिल्यांदा भारतासाठी लॉन्च केली अशा प्रकारची योजना
मीडिया मध्ये प्रकाशित बातम्या नुसार फेसबुक या सोशल मीडिया मधील ओळखीचे नाव आहे. असा कोणताही व्यक्ती नाही की त्याला फेसबुक माहिती नाही. सोशल मीडियामध्ये राज केल्यानंतर फेसबुक आता लोन सेक्टर मध्ये आपला पाऊल ठेवत आहे.यासाठी कंपनीने भारतासाठी स्मॉल बिजनेस लोन इनीशिटीव्हयोजनेची घोषणा केली आहे. या अगोदर फेसबुक ने जगातील कुठल्या देशांमध्ये अशी योजना सुरू केली नाही.
फेसबूक नेइंडीफी कंपनीसोबत केला करार
फेसबुक ने स्मॉल बिजनेस लोन इनिशिटिव्ह योजना कार्यान्वित करण्यासाठी वित्तीय कंपनी इंडीफीसोबत करार केला आहे. फेसबुक या कंपनीच्या माध्यमातून लोन उपलब्ध करून देणार आहे.हे लोन तुम्हाला इंडीफी कंपनीच्या माध्यमातून दिले जाईल. यामध्ये फेसबुक छोटे व्यापारी आणि कंपनी यामध्ये एक पूल सारखे काम करेल. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी फेसबूकच्या माध्यमातून मदत मिळेल.
कोणत्या पद्धतीने या स्किम द्वारे लोन मिळेल?
फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि प्रबंध निदेशक अजित मोहन यांनी मीडियाला सांगितले की या स्कीम द्वारे कुठल्याही मोरगेज विना व्यापाऱ्यांना लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांना या योजनेद्वारे कर्ज घेण्यासाठी अगोदर आपल्या स्वतःच्या व्यवसायाची फेसबुक द्वारे जाहिरात करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पाच लाख ते 50 लाख पर्यंत लोन मिळू शकते.
या कर्जावर किती द्यावे लागेल व्याज?
फेसबूक कडून घोषित केला गेलेला स्मॉल बिजनेस लोन इनिशिएटिव्ह द्वारे लोन घेतल्यावर त्यावर 17 ते 20 टक्के या दराने व्याज लागेल.या लोन साठीअर्ज करण्यासाठीइंडिफीलोन एप्लीकेशन वर कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी घेतली जाणार नाही. तसेच महिला व्यापाऱ्यांना या व्याजदरांमध्ये 0.2 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.तसेच या लोन स्कीम मध्येलोन घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे जमीन द्यायची गरज नाही. तसेच सामान्यपणे बँका लोन देताना दोन व्यक्तींची जामीनदार म्हणून मागणी करतात. अशा पद्धतीची आवश्यकता यामध्ये नाही.

Published on: 27 August 2021, 11:42 IST