News

कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आजशिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाडआणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Updated on 26 August, 2021 11:13 AM IST

 कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आजशिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाडआणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 या निर्णयाचा उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय शिक्षणात असलेला कृषी शिक्षणाचा सहभाग हा तीन टक्क्यांवर आणणे अपेक्षित आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाबद्दल ओढ निर्माण  पुण्याबरोबरच शेतकऱ्यांविषयी चे सामाजिक बांधिलकीनिर्माण होईल. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात संशोधक तयार होण्यास मदत होऊन संशोधनाला चालना मिळेल असे सांगून शेतीला गतवैभव आणि निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

 तसंच बोलताना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या वयानुरूप कृषी क्षेत्रातील संबंधित संदर्भ विद्यार्थ्यांनी शिकल्यामुळे त्यांच्यात शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लागेल. तसेच त्याचा फायदा हा पीक उत्पादन पद्धतीत सुद्धा होण्यास मदत होईल. या शिक्षणाच्या माध्यमातून उभी राहिलेली शेतकऱ्यांची नवी पिढी तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रीय शेती व्यवसाय करू शकेल त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते, असेही बोलताना पुढे भुसे  यांनी सांगितले.

 शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे या विषयाचा अभ्यासक्रम तयार करावा,

त्यावर सातत्याने विचार विनिमय करून सर्वांकश घटकांचा समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर उपस्थित होते.

English Summary: agri subject involve in school carriculam
Published on: 26 August 2021, 11:13 IST