डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ येथे कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी अॅग्री बिझनेस इनक्यूबेषन सेंटर करण्यात आले कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कृषी क्षेत्रातीलना विण्यपुर्णता आणि कृषी उद्योजकता आदी घटकांसह कृषी व शेतकरी कल्याणमंत्रालय, भारत सरकार द्वारा राबविण्यात येत आहे.
कृषी व्यवयास व स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर (राबी) डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला येथे दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी कार्यक्रमाला नविन उद्योजक, शेतकरी उपस्थितीत होते. कार्यक्रम हा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस. जे. गहुकर (प्रमुख व मुख्य अन्वेषक) अॅग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला यांनी केले व कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. संजय लाकडे ( संचालक, नयन मेकाट्रॉनिक्स, पुणे) व श्री. पंकज महल्ले (संस्थापक ग्रामहित यवतमाळ) यांनी कृषी उद्योजक व नविन स्टार्टअप यांना व्यवसायाचे नियोजन व व्यवसाय यशस्वीतेसाठी लागणा-या बाबी बद्दल मार्गदर्शन केले.
यशस्वी स्टार्टअपस् ने आपले उत्पादने व यंत्रांची माहिती सादर केली तसेच उपस्थीत शेतक-यांनी त्यांच्या शंकांचे निरसरण करुण घेतले.
या योजने अंतर्गत युवक व अस्तीत्वात असलेल्या स्आर्टअपसाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत कार्यक्रम सुरू करण्यात आला. अॅग्री बिझनेस इनक्युबेषन सेंटर मध्ये या कार्यक्रमा अंतर्गत दोन प्रकारांचा समावेष आहे प्री-सीड स्टेज फंडींग व सीड स्टेज फंडींग. ज्यांच्याकडे कृषी आणि संबंधीत क्षेत्रात व्यवसाय करण्याची नाविण्यपुर्ण कल्पणा
आहे त्यांच्यासाठी प्री-सीड स्टेज फंडींग प्रोग्राम एक व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात सर्व औपचारीकता पुर्ण झाल्यानंतर रू. 5 लक्ष पर्यंतचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
सीड स्टेज फंडींग या कार्यक्रमा अंतर्गत कृषी व संबंधीत क्षेत्रातील विद्यमान स्टार्टअप, किमान व्यवहार्य उत्पादन, प्रोटोटाईप / सेवा इत्यादी साठी रू. 25 लक्ष पर्यंतचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
डॉ. पंजाबराव देषमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननिय कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले. यांचे मार्गदर्शनात व संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्च व डॉ. वाय. बी. तायडे, अधिष्ठाता, तसेच डॉ. आर. एम. गाडे, संचालक विस्तार शिक्षण यांच्या सहकार्याबद्दल डॉ. एस. जे. गहुकर ( प्रमुख व मुख्य अन्वेषक) अॅग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर डॉ. पं.दे.कृ. वि. अकोला यांनी आभार मानले.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 26 April 2022, 10:29 IST