News

शेतकऱ्यांना त्यांच्या स्थान वरून आणि मागणीवर आधारित टेली कृषी सल्ला पुरवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कार्पोरेशन यांनी झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन चा सध्याचा असलेला इंटरॅक्टिव्ह इन्फॉर्मेशन डिसे मी नेशन सिस्टीम मंच, आय सी ए आर च्या प्रस्तावित किसान सारथी कार्यक्रमा बरोबर अधिकृत करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

Updated on 13 June, 2021 10:22 AM IST

  या कराराचा उद्देश आहे की देशातल्या बहुसंख्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी आयसीएआर च्या नेटवर्क मार्फत याची अंमलबजावणी करणे हा होय. गाव पातळीवर विविध कृषिविषयक बाबींना सहाय्य करण्यासाठी मल्टीमीडिया, बहुविध सल्ला आणि संवाद प्रणाली उभारण्यासाठी, आयसीटी मंच विकसित आणि उपयोगात आणण्यासाठी सहकार्य करणे बाबत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि डिजिटल इंडिया कार्पोरेशन यांच्यात सहमती झाली आहे. यामध्ये अगदी सुरुवातीला भारतीय कृषी संशोधन परिषदत आय आय डी एस द्वारे शेतकऱ्यांकडून मोबाईल फोनचा वापर करत कृषिविषयक माहिती गोळा करता येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्याची मागणी केली आहे अशी वैयक्तिक आवश्यकता वर आधारित माहिती प्राप्त करण्याचा पर्याय आय डी एस डी देईल.

 शेतकऱ्यांना शंकांचे निरसन करताना तज्ञांना शेतकऱ्याचा डाटाबेस पाहणे शक्य राहील अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी तज्ञांकडे उपस्थित केलेल्या समस्या उत्तम पद्धतीने जाणून घेण्यासाठी आणि जलद गतीने त्यांचे निराकरण करण्यासाठी तोडगा सुचवण्यासाठी मदत होणार आहे.

 सध्या आय आय डी एस मंच ईशान्येकडील राज्य, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये कार्यरत असून आय सी टी आर समवेत

झालेल्या सामंजस्य करारामुळे संपूर्ण देशभरात त्याचा विस्तार होणार आहे.

 माहिती स्त्रोत – पुण्यनगरी

English Summary: agri advice to farmer
Published on: 13 June 2021, 10:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)