News

किचन बजेटला आणखी एक मोठा फटका बसला आहे. खरे तर कांदा-टोमॅटोचे भाव चढे असल्याने आता लसणाने चिंता वाढवली आहे. अशा परिस्थितीत लसणाच्या दरात वाढ झाल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, त्यामुळे लसूण काही काळ स्वयंपाकघरातून गायब होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, लसणाचे भावात आणखी वाढ होवू शकते.

Updated on 12 December, 2023 5:21 PM IST

किचन बजेटला आणखी एक मोठा फटका बसला आहे. खरे तर कांदा-टोमॅटोचे भाव चढे असल्याने आता लसणाने चिंता वाढवली आहे. अशा परिस्थितीत लसणाच्या दरात वाढ झाल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, त्यामुळे लसूण काही काळ स्वयंपाकघरातून गायब होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, लसणाचे भावात आणखी वाढ होवू शकते.

लसणाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळेच लसूण आता सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा ठरत आहे. किरकोळ बाजारात लसणाचा भाव 300 ते 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, लसणाचे भाव आणखी वाढू शकतात. खराब हवामानामुळे लसूण पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे लसणाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे आणि या खराब पिकामुळे पुरवठा कमी झाला आहे.

आता महाराष्ट्रातील मुंबईचे घाऊक विक्रेते गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून लसूण खरेदी करत आहेत. यामुळे लॉजिस्टिक खर्च आणि इतर स्थानिक खर्च वाढले आहेत. याचा परिणाम लसणाच्या दरावर झाला आहे. लसणाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे.

लसणाचा नवा भाव - 
लसणाचा किरकोळ दर 300 ते 400 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यापर्यंत हाच लसूण 100 ते 150 रुपये किलोने मोठ्या प्रमाणात विकला जात होता.

लसणाचे भाव का वाढले?
यावर्षी खराब हवामानामुळे अनेक पिकांची नासाडी झाली. त्यात लसूण देखील आहे. लसणाचे पीक नष्ट झाल्याने त्याचा पुरवठा कमी होऊन मागणी वाढली. एवढेच नाही तर मुंबईसारख्या मोठ्या शहरात मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून लसणाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे ऑपरेशनल कॉस्ट वाढली आहे. जो लसणाच्या भावात जोडून आकारला जात आहे.

हवामान - 
पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने पिकावर परिणाम झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उर्वरित पिकांची नासाडी झाली. नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव उतरण्याची चिन्हे नाहीत.

English Summary: After tomato-onion, there has been a big increase in the price of garlic
Published on: 12 December 2023, 05:21 IST