सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळं संतापाचं वातावरण देखील आहे. कमी दर मिळत असल्यानं मार्च महिन्यापूर्वी बँकेच्या कर्जाची परतफेड करण्याचं आव्हान शेतकऱ्यांपुढं आहे. त्यामुळं शेतकरी बाजारात इच्छा नसली तरी शेतमाल विकत आहे.
यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार समोर आणला आहे. शेतकऱ्यानं १० पोती कांदा व्यापाऱ्याला मिळाला त्यातून त्याला अवघे ५१२ रुपये त्यापैकी ५०९ रुपये वजा करुन घेत त्याला २.४९ रुपयांचं बील देण्यात आलं आहे.
यासाठी त्याच्या नावे केवळ २ रुपयांचा चेक काढण्यात आला. हा चेक देखील १५ दिवसांच्या पुढचा देण्यात आला आहे. राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यानं ५१२ किलो कांदा व्यापाऱ्याला विकला. त्याचं बील १ रुपये दराप्रमाणं ५१२ रुपये झालं. हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल यासाठी त्यातील ५०९.५१ रुपये कापून घेण्यात आले.
ओडिशामध्ये दोन दिवसीय 'उत्कल कृषी मेळा' आयोजित, OUAT च्या कुलगुरूंनी केले उद्घाटन
त्यातून राहिलेली २.४९ रुपयांची रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूरच्या शेतकऱ्याला आलेला अनुभव मांडला आहे. तसेच या चेकवर ८ मार्च २०२३ ही तारीख टाकण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळं राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
जर्सी गाईं चोरणारी टोळी अखेर सापडली, 33 लाखांच्या गाईंची केली होती चोरी..
शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. असे म्हणत राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या;
18 वर्षांची मुलगी अभ्यासासोबतच डुकर पालनातून कमवतेय लाखो रुपये
मोठी बातमी! मोदी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार, सर्व खाद्यपदार्थ स्वस्त होणार
आज राज्यभर 'स्वाभिमानी'चा चक्काजाम, शेतकरी प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक...
Published on: 22 February 2023, 05:09 IST