CNG-PNG Price Hike: देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात इंधनाचे दर (Fuels Rate) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. कारण सणासुदीच्या तोंडावर सीएनजी (CNG)-पीएनजीच्या (PNG) दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एवढेच नाही तर वीज ते खतही (Fertilizer) महाग होऊ शकते. खरं तर, 30 सप्टेंबर 2022 रोजी सरकार घरगुती गॅसच्या किमतींचा आढावा घेणार आहे आणि असे मानले जात आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर सरकार 1 ऑक्टोबर 2022 पासून देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या (natural gas) किमतींमध्ये मोठी वाढ करू शकते.
1 एप्रिल 2022 रोजी नैसर्गिक वायूची किंमत $6.10 प्रति एमएमबीटीयू पर्यंत वाढवण्यात आली. परंतु 1 ऑक्टोबर 2022 पासून, ते $9 प्रति mmBtu पर्यंत वाढवले जाऊ शकते. म्हणजेच थेट किमतींमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे.
महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धो धो पाऊस कोसळणार; या भागांत यलो अलर्ट जारी
एप्रिलमध्ये दुप्पट दरवाढ झाली होती. याशिवाय, सरकार खोल क्षेत्रातून काढलेल्या नैसर्गिक वायूची किंमत $9.92 प्रति एमएमबीटीयू वरून $12 प्रति mmBtu पर्यंत वाढवू शकते.
गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानंतर स्वयंपाकघरातील स्वयंपाक ते वीज आणि वाहतूक खर्च वाढणार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत.
वीजबिलाचे नो टेन्शन! शेतकऱ्यांनो फक्त अर्ध्या किमतीमध्ये बसावा सोलर पंप; वाचा सविस्तर...
तुम्हाला सांगतो की सरकार दर सहा महिन्यांनी देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेते. नैसर्गिक वायूच्या किमतीत एक डॉलरने वाढ झाल्यास सीएनजीच्या किमतीत 4.5 रुपये प्रति किलोने वाढ होते.
अशा स्थितीत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 12 ते 13 रुपयांनी वाढ करावी लागू शकते. त्यामुळे घरांना वीज पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किमतीही वाढणार आहेत. सरकारवरील खत अनुदानाच्या बिलावरील खर्चाचा बोजाही वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार; कारण...
देशी गायी आणि म्हशींच्या पशुपालकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; मिळणार 5 लाखांचे बक्षीस; असा करा अर्ज
Published on: 27 September 2022, 04:18 IST