खरीप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे आणि हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वर्षी निसर्गाच्या कोपातून शेतकऱ्यांची सुटका होणं खूपच अवघड आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे.पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेलं आहे.
फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान:
पावसामुळे अनेक पीक पाण्याखाली गेल्याने खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झालेली आहे. आणि शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.या सततच्या पडणाऱ्या पावसाचा सगळ्यात मोठा परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. या फलबागांमध्ये संत्री पपई मोसंबी या फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या अचलपूर येथे फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळं तेथील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा पपईला बुरशीजन्य कीटकांनी वेढलेलं आहे. त्यामुळं फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळं फळबागांत गुंतवलेले पैसे सुद्धा कठीण आहे.
अचलपूर तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्र हे संत्र्याच्या लागवडीखाली आहे त्यामुळं येथे लाखो व्यवसाय केले जातात. परंतु मुसळधार झालेल्या पावसामुळे येथील बागांवर बुरशीजन्य कीटकांच्या प्रादुर्भावामुळे फळगळती झाली आहे.त्यामुळं संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बुरशी आणि रोगराई मुळे चक्क 20 लाख रुपयांपर्यंत विक्री होणारी संत्र्याची बाग आता व्यापारी फक्त 4 ते 5 लाखापर्यंत मागत आहेत त्यामुळं येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे.
उत्पादन कमी परंतु खर्च जास्त:- बुरशी मुळे आणि रोगराई मुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागांतील 80 टक्के फळ ही बुरशी मुळे गळून पडली आहेत आणि राहिलेल्या फळांना सुद्धा योग्य भाव भेटत नसल्यामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. या नुकसनामुळे बागेत घातलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
Published on: 25 October 2021, 02:17 IST