गेल्या काही महिन्यांपासून चक्रीवादळांची मालिका सलगपणे पाहायला मिळत आहे. यातील बहुसंख्य चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात तर काही अरबी समुद्रात निर्माण झाली होती. ज्या राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसतो त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळाले.
विशेषता या चक्रीवादळाच्या तडाख्यात शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. बंगालच्या उपसागरात आलेल्या गुलाब चक्रीवादळाने आंध्र प्रदेश, ओडीसा सर महाराष्ट्रालाही फटका दिला. परंतु आता अजून एक संकट महाराष्ट्र कडे येऊ पाहत आहे. ते म्हणजे शाहीन नावाचे चक्रीवादळ येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांना धडक देणार असा इशारा आयएमडीने दिला आहे.
टीव्ही नाईन हिंदी ने दिलेल्या वृत्तानुसार गुलाब पेक्षा जास्त भयंकर असलेले हे वादळ अरबी समुद्रात तयार होणार आहे. या चक्रीवादळाला हे नाव व ओमान देशानेदिलेआहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढील दोन-तीन अत्यंत महत्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये असलेले हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात पोहोचेल आणि नंतर इथे पोहोचल्यावर स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार गुलाब चक्रीवादळ पेक्षा तीव्र स्वरूपाच्या असणारे वादळ महाराष्ट्राच्या पश्चिम तटांवरन धडकता समुद्रातूनचओमानच्यादिशेने निघून जाणार आहे. मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गुजरातचा काही भागांमध्ये दिसेल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने ओडिशा आणि आंध्र प्रदेश मध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला. सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अती मुसळधार पाऊस पडत आहे.
Published on: 29 September 2021, 10:35 IST