African Malawi Hapus : आंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. आफ्रिकन देश मलावीमधून हापूस आंबा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत मलावी देशातून या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे.
मलावीतील हापूस आंब्यालाही भारतात मोठी मागणी आहे. दरवर्षी हा आंबा देशाच्या बाजारपेठेत दाखल होतो. यंदाही मुंबईच्या एपीएमसी बाजार समितीत मालवी येथील हापूस आंबा दाखल झाला आहे. या मालवी आंब्याला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठी मागणी आहे.
गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची भारतात आयात केली जात आहे. पंधरा वर्षांपूर्वी कोकणातील झाडांच्या फांद्या मलावी या आफ्रिकन देशात नेण्यात आल्या. जवळपास साडेचारशे एकरांवर आंब्याची लागवड होते.
EPFO : खुशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार 81,000 रुपये! या तारखेला खात्यात पैसे येतील, असे चेक करा
या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्यासारखीच असल्याने या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपये आहे. आज एपीएमसी मार्केटमध्ये एकूण 800 पेट्यांची आवक झाली आहे.
दुधाचे दर पुन्हा वाढणार? आली मोठी अपडेट...
एपीएमसीच्या फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांच्या गाळ्यात तब्बल ९०० बॉक्स या हापूस आंब्याचे शनिवारी आगमन झाले. तीन किलोच्या बॉक्सला तीन हजार ७०० ते पाच हजार किंमत मिळाली असून त्यामध्ये साधारणतः नऊ ते १६ आंबे भरले जातात. या हंगामात दहा हजार बॉक्स माल येण्याची शक्यता आहे.
Gujarat Election: गुजरातसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस; एकदा वाचाच..!
Published on: 27 November 2022, 06:00 IST