कृषी निर्यात झोनचा नियोजित कालावधी पूर्ण

Thursday, 03 January 2019 08:47 AM


नवी दिल्ली:
विशिष्ट उत्पादनाशी संबंधित बाबींवर सर्वंकष दृष्टीक्षेप रहावा आणि निर्यातीच्या दृष्टीने सर्व बाबींचा विकास व्हावा यासाठी 2001 मध्ये एईझेड अर्थात कृषी निर्यात विभाग निर्माण करण्यात आले. मात्र हे विभाग अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत नसल्याचे 2004 च्या डिसेंबरमध्ये घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले. त्यामुळे नवे कृषी निर्यात विभाग स्थापन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिसूचित सर्व कृषी निर्यात विभागांनी पाच वर्षाचा नियोजित कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांचे काम थांबवण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ एईझेडचा समावेश आहे.

यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ एईझेडचा समावेश आहे तो खालीलप्रमाणे:

1

द्राक्ष

नाशिक, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर. 

2

आंबा (अल्फान्सो)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे.

3

आंबा (केशर)

औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर आणि लातूर. 

4

फुले

पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली.

5

कांदा

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, जळगाव आणि सोलापूर.

6

डाळिंब 

सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, नाशिक, लातूर आणि उस्मानाबाद.

7

केळी

जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वर्धा, परभणी, हिंगोली आणि नांदेड. 

8

संत्रा

नागपूर आणि अमरावती.

 

20 राज्यातले 60 एईझेड प्रकल्प 2004-05 पर्यंत अधिसूचित करण्यात आले होते.

AEZ एईझेड कृषी निर्यात विभाग Agricuture Export Zone

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.