News

सातारा जिल्ह्यातील माण खटाव या तालुक्याची ओळख म्हणजे दुष्काळी तालुका अशी आहे. येथे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची पंचाईत होते, याठिकणी जर कोणी म्हटले की स्ट्रॉबेरी लावायची आहे तर लोक हसतील आणि आपल्याला येड्यात काढतील. मात्र आता येथील दोन शेतकऱ्यांनी हे करून दाखवले आहे.

Updated on 27 January, 2022 5:59 PM IST

सातारा जिल्ह्यातील माण खटाव या तालुक्याची ओळख म्हणजे दुष्काळी तालुका अशी आहे. येथे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची पंचाईत होते, याठिकणी जर कोणी म्हटले की स्ट्रॉबेरी लावायची आहे तर लोक हसतील आणि आपल्याला येड्यात काढतील. मात्र आता येथील दोन शेतकऱ्यांनी हे करून दाखवले आहे. यामुळे यांची सध्या चर्चा रंगली आहे. यामुळे आता कायम थंड हवेत बहरणारी ही स्ट्रॉबेरी चक्क दुष्काळी भागात बहरलेली आहे. साताऱ्याच्या दुष्काळी खटाव तालुक्यातील ही बातमी सुखद धक्का देणारीच आहे. सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले यांनी हा प्रयोग केला आहे. हे दोघेही प्रयोगशील शेतकरी आहेत.

त्यांनी 30 गुंठ्यांत या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले असून, महिन्याकाठी ही स्ट्रॉबेरी तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत उलाढाल करत आहे. पाणी भरपूर असणाऱ्य़ा ठिकाणी शेतीचे विविध प्रयोग केले जातात. पण दुष्काळी भागातही असे प्रयोग यशस्वी ठरू शकतात, हे समोर आले आहे. ही स्ट्रॉबेरी प्रत्यक्षात पाहण्यासाठी शेतावर अनेक तरुण शेतकरी पोहचत आहेत. तसेच शेतातील फोटो काढून घेत आहेत.

यामुळे आता या दोन शेतकऱ्यांनी केलेल्या या अद्भूत उत्पादनामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण केली आहे. यामुळे आता या परिसरात याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. या दुष्काळात दोन तरुण प्रयोगशील शेतकऱ्याने ही स्ट्रॉबेरी पिकवत केलेली किमया दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तसेच यामधून त्यांनी कमी दिवसात जास्त पैसे कमवले आहेत. यामुळे परिसरातील अनेक शेतकरी हे पीक बघण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावत आहेत.

हे पीक आपण बघतो की महाबळेश्वर पाचगणी सारख्या ठिकाणी येते. मात्र आता अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात पारंपारिक शेतीला फाटा देत अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. यामधून ते मोठ्या प्रमाणावर पैसे देखील कमवत आहेत. यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील असेच प्रयोग करून शेती केली तर त्यामधून त्यांना नक्कीच चांगले पैसे मिळतील. तसेच कमी कालावधीत आपल्याला अनेक पिके आपल्याला पैसे मिळवून देतील.

English Summary: Admirable! Strawberries flourished during the drought, an innovative experiment of farmers in Khatav ..
Published on: 27 January 2022, 05:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)