महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादन प्रकल्पाला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सीड सायन्स (मऊ, उत्तर प्रदेश) येथे झालेल्या वार्षिक बियाणे उत्पादन आढावा बैठकीत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. यावेळी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) बियाणे विभागाचे सहायक निदेशक डॉ. डी. के. यादव, भारतीय बियाणे संशोधन संस्थेचे संचालक डॉ. संजयकुमार व केंद्र सरकारच्या बियाणे विभागाचे सचिव आश्विनकुमार या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आणि राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला विविध उपक्रमांनी गौरविण्यात आले आहे. देशभरातील ६५ बीजोत्पादन प्रकल्पांपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रकल्पातून उत्पादित होणारे फ्लॉवर बियाणे देशातील शेतकरी आणि बियाणे कंपन्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
कांदा फुले समर्थ बियाण्यास महाराष्ट्रातून मोठी मागणी असते. विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन पिकाच्या, फुले संगम व फुले किमया या वाणांच्या बियाण्यांसाठी शेतकरी पहिली पसंती देतात. विद्यापीठात २७ पिकांच्या वाणांचे मूलभूत व पायाभूत बीजोत्पादन करून, हे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नॅशनल सीड कॉर्पोरेशन व बियाणे उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी गटांना उपलब्ध करून दिले जाते.
कांदा फुले समर्थ बियाण्यास महाराष्ट्रातून मोठी मागणी असते.विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले संगम आणि फुले किमया या सोयाबीन पिकाच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे. विद्यापीठात २७ पिकांच्या वाणांचे मूलभूत व मूलभूत बियाणे तयार करून हे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि बियाणे उत्पादक तसेच शेतकरी गटाला उपलब्ध करून दिले जाते.
विद्यापीठातील बीजोत्पादन कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व दहा जिल्ह्यांतील प्रक्षेत्रांवर राबविला जातो. कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे विभागाने हे यश मिळवले आहे. डॉ.आनंद सोळंके, डॉ.चंद्रकांत साळुंखे, डॉ.कैलास गागरे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. विद्यापीठाने संशोधन केलेल्या विविध सुधारित वाणांचे बियाणे येथून विकले जाते. त्यालाही चांगली मागणी आहे.
सुधारित वाणांमुळे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील म्हणाले की, विद्यापीठाने नेहमीच शेतकऱ्यांना बियाणे आणि विकसित वाण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ५४७ बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. सोयाबीन, कांदा बियाणांच्या विक्रीसाठी विद्यापीठाने ऑनलाइन मार्केटिंग सुरू केले आहे. विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांतील २७ विक्री केंद्रांतून या बियांची विक्री केली जाते. बियाणे विभागाच्या मेहनतीमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
Ration Card: रेशनकार्ड धारकांना होणार मोठा फायदा; सरकारने केली मोठी घोषणा
Published on: 14 May 2022, 02:19 IST