News

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत योजनेच्या अंमलबजावणीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून लवकर ही योजना पूर्णत्वाला नेली जाणार आहे.

Updated on 27 October, 2021 9:01 AM IST

 महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत योजनेच्या अंमलबजावणीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून लवकर ही योजना पूर्णत्वाला नेली जाणार आहे.

या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणीकरणाच्या यादीत आहेत, परंतु अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलेनाही त्यांच्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबर पर्यंतचअंतिम मुदत देण्यात आलेली आहे. यासाठी सहकार विभागाने विशेष मोहीम राबवली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील 1104 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असून कर्जमुक्ती पासून वंचित आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मुक्ती शेतकऱ्यांना दिली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही त्यांना कर्जमुक्ती पासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे. आशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने नवी संधी दिली असून  15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

आधार प्रमाणीकरण कुठे करावे?

 ज्या शेतकऱ्यांचे कर्ज मुक्ती यादीत नाव आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांचे पासबुक, आधार कार्ड घेऊन संबंधित बँकत किंवा जवळच्या  आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे 

तसेच बँकेचे नोडल अधिकारी व तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने शेतकऱ्यांशी यंत्रणेमार्फत संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घेण्याची कार्यवाही करावी. आधार प्रमाणीकरणासाठी ही शेवटची मुदत असून या मुदतीत आधार प्रमाणीकरण न केल्यास संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

English Summary: adhaar certification is important for debt forgivness
Published on: 27 October 2021, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)