News

राज्यातील सत्ताधारी महा विकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. परंतु या योजनेला दोन वर्षे उलटून देखील अनेक शेतकरी अजून या योजनेपासून वंचित आहेत.

Updated on 23 October, 2021 9:57 AM IST

 राज्यातील सत्ताधारी महा विकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. परंतु या योजनेला दोन वर्षे उलटून देखील अनेक  शेतकरी अजून या योजनेपासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ न मिळण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपले बँक खाते आधारशी  लिंक केलेले नसल्याचे समोर येतेय. तसेच दुसरे कारण सांगितले जाते की राज्य सरकारच्या तिजोरीत असलेल्या खडखडाट या दोन्ही कारणांमुळे अजूनही बरेचसे शेतकरी कर्जमुक्ती च्या प्रतीक्षेत आहेत.

अशा शेतकऱ्यांना आता 15 नोव्हेंबर पर्यंत आपले बँक खाते आधार लिंक करावे लागणार आहे. अन्यथा त्यांना कायमचे कर्जमुक्तीला मुकावे लागण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जाते. यासाठी एक मोहीम राबवली जाणार असून या मोहिमेत शेतकऱ्यांची बँक खाते आधार लिंक करण्यासह शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीचे निवारण केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेत महा विकास आघाडी सरकारने तीन लाखापर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी तर चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर50 हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते.

परंतु  राज्य सरकारचे हे आश्वासन हवेतच विरल्या ने बँक खाते आधारशीलिंक केल्यावर तरी कर्जमाफी मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.सरकारने अजूनही प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचा निधी बँकेत जमा केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरण्यासाठी बँकाचा तगादा सुरू झाला आहे.

 आधार प्रमाणीकरण कुठे कराल?

 आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण यासाठी तालुका सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात व बँकेशी संपर्क साधावा.

English Summary: adhaar card link with your bank account is important for debt forgiveness
Published on: 23 October 2021, 09:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)