News

शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या क्षेत्रावर फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) बसवून कापूस पिकाचे संरक्षण करावे. यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. या सापळ्यात शेंदरी बोंडअळी, त्याचा कोष किंवा पतंग आढळून आल्यास कृषी सहायक, कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक यांच्याकडे तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Updated on 31 July, 2018 10:10 PM IST

शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या क्षेत्रावर फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) बसवून कापूस पिकाचे संरक्षण करावे. यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. या सापळ्यात शेंदरी  बोंडअळी, त्याचा कोष किंवा पतंग आढळून आल्यास कृषी सहायक, कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक यांच्याकडे तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

श्री. पाटील यावेळी म्हणाले, यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील स्वस्तिक जिनिंग मिल व बजरंग जिनींग मिल मध्ये फेरोमन ट्रॅप बसविण्यात आले होते. त्यात गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेंदरी बोंड अळीचे सुमारे २६ पतंग आढळून आले आहेत. तसेच, अमरावती जिल्ह्याच्या नेमामी व लोंढा जिनिंग मिलमध्ये २६अकोला येथील जे. एस. कॉटन, केडिया, पद्मावती, जस्मनीत जीनिंग मिलमध्ये देखील सेंदरी बोंडअळीचे सुमारे ४४ पतंग आढळून आले आहेत.

शेतकऱ्यांनी फेरोमन ट्रॅप बसवून कापूस पिकाचे रक्षण करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले.

English Summary: Active Participation To Protect Cotton Crop Use Pheromone Trap
Published on: 10 July 2018, 09:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)