मुंबई: केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे 5 हजार 675 रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
गेल्या वर्षीच्या हंगामात 2 फेब्रुवारी 2018 पासून खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. यंदाच्या हंगामातील आधारभूत किंमतीने तूर खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहे. आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी 7/12 उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
Published on: 27 December 2018, 07:29 IST