News

मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Updated on 14 July, 2023 5:10 PM IST

मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री - सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री - गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

अजित पवार - अर्थ आणि नियोजन
दिलीप वळसे पाटील - सहकार
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य
छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
आदिती तटकरे - महिला व बालविकास
धनंजय मुंडे - कृषी
धर्मरावबाबा आत्राम- औषध व प्रशासन
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

English Summary: Account allocation finally announced; NCP got this powerful account
Published on: 14 July 2023, 05:10 IST