News

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गायीच्या शेणाने पेंट बनवण्यात येत आहे. या विषयाची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. लवकरच एक वैदिक पेंट लॉन्च केला जाणार आहे.

Updated on 20 December, 2020 3:46 PM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गायीच्या शेणाने पेंट  बनवण्यात येत आहे. या विषयाची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. लवकरच एक वैदिक पेंट  लॉन्च केला जाणार आहे. या पेंटमध्ये अनेक खासियत आहेत. या पेंटने पर्यावरणाचा स्तर  चांगला राखण्यात मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.

वर्षाला वाढेल 55 हजार रुपयांचे उत्पन्न

सरकारने गायीच्या शेनापासून पेंट  तयार केला असून मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादनही केला जाणार आहे. या पेंट  मध्ये गाईच्या शेणाचा वापर केल्यामुळे शे नाची मागणी वाढण्यास मदत होईल. हे लागणारे शेन शेतकरी आणि गोशाळा यांच्याकडून विकत घेतली गेल्यामुळे त्यांचे उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या उत्पादनात तब्बल 55 हजार रुपयांची वाढ होईल. सरकार गायचं सेनाच सामान किंवा खाद्य  इत्यादी ला चालना देण्यासाठी शंख खरेदी करणार आहे. या योजनांमध्ये शेतकऱ्यांकडून गाईचं शेण  विकत घेतला जाईल. यासाठी छत्तीसगड सरकारने गोधन न्याय योजना सुरुवात केली आहे. 

या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांकडून सरकार शेणखत खरेदी करणे आणि त्यांना प्रति किलोमागे दोन रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. केंद्र सरकार इतर राज्य मध्ये हे मॉडेल लागू करायची शक्यता आहे.

रोजगार वाढण्यास मदत:

गायीच्या शेना मुळे प्रॉडक्ट, खते इत्यादी बनवणार इंडस्ट्री यशस्वी होते तरी तरुणांना रोजगाराची संधी मिळते. छत्तीसगड सरकार गावांमधून शेण  खरेदी करण्यासाठी गोट्यांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे लोकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

English Summary: According to the government's new plan, the income will increase by more than 55,000 per annum
Published on: 20 December 2020, 03:45 IST