सध्या केंद्र सरकारने जनतेला २२ खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगितले आहे. जे की यामध्ये तांदूळ, गहू तसेच मैद्याच्या किमतीमध्ये पाच वर्षात किती होत्या त्या सांगितल्या गेल्या आहेत. खाद्यपदार्थांच्या किमतीबद्धल प्रश्न हा आसामचे खासदार एम. अबरुद्दीन यांनी विचारला होता जे की या प्रश्नाला अन्न मंत्रालयाने उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने खाद्यपदार्थांच्या किमतीबद्धल बोलताना सांगितले की तांदूळ, गहू तसेच मैद्याच्या किमती वाढलेल्या आहे.
तांदळाची किंमत किती?
मागील पाच वर्षांमध्ये तांदळाचे दर दिवसेंदिवस वाढत गेले आहेत. जे की जवळपास ८ रुपयांनी मागील पाच वर्षात तांदळाच्या दरात वाढ झालेली आहे. २०१६ साली तांदळाची प्रति किलो २७.७१ रुपये किमंत होती तर २०१७ साली तांदळाची किमंत प्रति किलो २९.५७ रुपये होती. २०१८ साली तांदळाची प्रति किलो किमंत ३०.०९ रुपये होती तसेच २०१९ मध्ये ३२.०९ रुपये प्रति किलो तांदळाची किमंत आणि २०२० मध्ये ३५.२६ रुपये होती. २०२१ मध्ये तांदळाची प्रति किलो किमंत ३५.६५ रुपये झाली आहे.
पाच वर्षांत गहू महागला :-
मागील पाच वर्षांमध्ये गहू पिकाचे ही दर दिवसेंदिवस वाढत गेले आहेत. जे की जवळपास १-१ रुपयांनी मागील पाच वर्षात गव्हाच्या दरात वाढ झालेली आहे. २०१६ साली गव्हाची प्रति किलो २३.८० रुपये किमंत होती तर २०१७ साली गव्हाची किमंत प्रति किलो २३.७५ रुपये होती. २०१८ साली गव्हाची प्रति किलो किमंत २४.७४ रुपये होती तसेच २०१९ मध्ये २७.५० रुपये प्रति किलो गव्हाची किमंत आणि २०२० मध्ये २८.२२ रुपये होती. २०२१ मध्ये तांदळाची प्रति किलो किमंत २६.९८ रुपये झाली आहे.
मैद्याचे दरही वाढले :-
गहू आणि तांडळाप्रमाणे मागील पाच वर्षांमध्ये मैद्याचे दर दिवसेंदिवस वाढत गेले आहेत. २०१६ साली मैद्याची प्रति किलो २५.६४ रुपये किमंत होती तर २०१७ साली मैद्याची किमंत प्रति किलो २६.०८ रुपये होती. २०१८ साली मैद्याची प्रति किलो किमंत २६.८० रुपये होती तसेच २०१९ मध्ये २८.९५ रुपये प्रति किलो मैद्याची किमंत आणि २०२० मध्ये ३१.१७ रुपये होती. २०२१ मध्ये मैद्याची प्रति किलो किमंत ३०.५० रुपये झाली आहे.
Published on: 10 February 2022, 01:58 IST