राज्य
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने कांदा लागवडीला चांगला वेग आला आहे. तर कर्नाटकातील काही भागांमध्ये कांदा लागवडीला जास्त उशीर होत असल्याने काढणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. त्यामुळे परिणामी बाजारातील आवक मर्यादीत राहून कांदा दराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
देशातील कांदा आवक घटली आहे. कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कांदा बाजार समितीत २४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर सरासरी दर १ हजार ४०० रुपयांवर पोचला. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या बाजारातील सरासरी भाव ८०० रुपये होता.
खानदेशात कांदा लागवडीची तयारी
खानदेशात कांदा लागवडीची तयारी सुरू झाली आहे. तसंच धुळ्यातही लागवड सुरु आहे. यंदा लागवड १० हजार हेक्टरवर स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये ६०० ते ७०० हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात साडेतीन ते चार हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे.
Published on: 21 July 2023, 06:16 IST