News

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असून एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 65 ते 70 टक्के लोकसंख्या शेती क्षेत्रावरअवलंबून आहे. भारतामध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. यामध्ये उसहे प्रमुख पीक आहे

Updated on 27 January, 2022 9:39 AM IST

भारतामध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. यामध्ये उस हे प्रमुख पीक आहेभारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असून एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 65 ते 70 टक्के लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतामध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. यामध्ये उसहे प्रमुख पीक आहे

भारतामध्ये ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश आहे.साखरेची बहुसंख्य निर्मितीही उसापासून किंवा बीट पासून केली जाते. जर एकूण साखर निर्मितीचा जगाचा विचार केला तर 80 टक्के साखर निर्मिती ही ऊसापासून केली जाते तर 20 टक्के ही बिट पासून केली जाते.भारतामध्ये बहुसंख्य साखर निर्मिती हीऊसा पासूनच केली जाते.

 साखर निर्मिती प्रक्रिया

 उसाचा रस मिळावा यासाठी उसाचे गाळप केले जाते तसेच त्यापासून उपउत्पादन म्हणून बगॅस ज्याचा तुम्ही निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो, तसेच अंशतः बंदिस्त वापरासाठी वापरले जाते आणि  उर्वरित  विकले जाते.

साखर आणि मोलॅसिस मिळवण्यासाठी उसाचा रस आवर प्रक्रिया केली जाते. जी एक तर थेट विकली जाऊ शकते किंवा पुढे दारू तयार करण्यासाठी डिस्टिलरी मध्ये प्रक्रिया केली जाते. हे तयार अल्कोहल एकतर इंडस्ट्रियल अल्कोहोल असू शकते जे केमिकल कंपन्यांना औद्योगिक वापरासाठी विकले जाते किंवा पिण्यायोग्य अल्कोहोल केव्हा इथेनॉल जे इंधनामध्ये मिसळण्यासाठी वापरले जाऊ शकते. जवळ जवळ एक टन उसापासून सरासरी 95 किलो साखर आणि 10.8 लिटर इथेनॉल तयार होऊ शकते.

जागतिक साखर उद्योगात भारतात 2016-17 नुसार 29.9 टक्के एवढे आहे तर सर्वात जास्त ब्राझील हा देश आहे.2016-17 नुसार 39.1 टक्के तर पाकिस्तान हा देश 6.0 टक्के उत्पादन करतो. ब्राझील हा ऊस उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये जगातील नंबर एक चा देश आहे. ब्राझील जगातील पन्नास टक्के साखरेचा पुरवठा करते. प्रतिवर्षी 654.8 मेट्रिक टन ऊस,41.25 मेट्रिक टन प्रक्रिया केलेली साखर आणि 29.7bn लिटर इथेनॉल तयार करते. परंतु ऊस उत्पादनासाठी समर्पित असलेल्या ब्राझिलियन जमिनीचे प्रमाण देशाच्या एकूण जमिनीच्या फक्त  1 टक्के आहे.

 ब्राझील, भारत आणि थायलंड हे मिळून 50 टक्केपेक्षा जास्त जागतिक साखर उत्पादन करतात. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वात मोठा साखर ग्राहक देश आहे. इथेनॉलचा उत्पादनासाठी 50 ते 60 टक्के ऊस वापरून ब्राझील हा  सर्वात मोठा साखर उत्पादक झाला आहे. भारताचा विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये 115 साखर कारखाने आहेत.  यापैकी बहुतेक खाजगी आहेत.तर  महाराष्ट्रात बहुसंख्य सहकारी साखर कारखाने आहेत.(स्रोत-कृषीनामा)

English Summary: about status of suger cane factory and suger making process in india
Published on: 27 January 2022, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)