News

आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीवर टीका करत भुजबळ म्हणालेत की, शिंदे समितीला मराठवाड्यातील दाखले तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती ती आता पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता ती बरखास्त करावी, तसेच सध्या जे कुणबी दाखले देण्यात येत आहेत तेही रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Updated on 27 November, 2023 5:57 PM IST

जस्टिस दिपक शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या समितीने जो अहवाल तयार केला आहे तो देखील स्वीकारणार नसल्याची भूमिका भुजबळांनी घेतली आहे. त्यामुळे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी वादात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना राज्यातील वातावरण बिघडू नये यासाठी काळजी घेण्याची विनंती केली होती. मात्र छगन भुजबळ हे आपल्या मतांवर ठाम असल्याचं दिसत आहे.

नुकतीच हिंगोली येथे झालेल्या सभेदरम्यान जस्टिस शिंदे समितीला मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी दिली असताना त्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये हे काम केलंच कसं असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर खोटी कागदपत्रे सादर करुन प्रमाणपत्र घेण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे सध्या जे कुणबी दाखले देण्यात येत आहेत तेही रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

English Summary: Abolish the Shinde committee, also cancel the Kunbi documents; Chhagan Bhujbal's demand
Published on: 27 November 2023, 05:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)