News

अमरावती: यंदा विदर्भात 15 जूनपूर्वीच पावसाचं आगमन झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बैलजोडी व ट्रॅक्टरने पेरणी करतो. मात्र, विदर्भातील काही शेतकरी तारफुलीच्या माध्यमातून शेतीची पेरणी करत आहेत. तारफुलीच्या माध्यमातून कमी मनुष्यबळ आणि कमी पैसा खर्च होतो.

Updated on 25 June, 2021 9:14 AM IST

अमरावती: यंदा विदर्भात 15 जूनपूर्वीच पावसाचं आगमन झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बैलजोडी व ट्रॅक्टरने पेरणी करतो. मात्र, विदर्भातील काही शेतकरी तारफुलीच्या माध्यमातून शेतीची पेरणी करत आहेत. तारफुलीच्या माध्यमातून कमी मनुष्यबळ आणि कमी पैसा खर्च होतो.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मालधूर येथील सतिश मुंद्रे या उच्च शिक्षित शेतकऱ्याने तारफुली पद्धतीचा वापर करत आपल्या शेताची पेरणी केलीय. मालधूर येथील युवा शेतकरी सतिश मुंद्रे यांनी इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलंय. तरी सुद्धा ते आपल्या गावात शेती करत आहेत. सध्या सतिश यांच्या 3 एकर शेतीत कपाशी व तुरीची लागवड करण्यात आली आहे.

 

साधारणत शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीच्या माध्यमातून पेरणी करतात. मात्र, ट्रॅक्टरची पेरणी खोलवर जाते, तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅकरचे पेरणी महागली आहे. बैलजोडीद्वारे पेरणी करण्याची पद्धत कालबाह्य होत आहे. वेळ, पैसा व मनुष्यबळ कमी लागत असल्यानं सतिश मुंद्रे यांनी तारफुलीच्या माध्यमातून पेरणी केली आहे.

तारफुली पद्धत नेमकी काय?

शेतात पेरणी करते वेळी तार घेऊन ठराविक अंतरावर काही खुणा केल्या जातात. शेतकरी त्या खुणांमध्ये बी टाकून ते मजवतो. विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस हे प्रमुख पीक आहे. तारफुली पद्धतीद्वारे युवा शेतकरी आर्थिक बचत करत आहे.दरम्यान, गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला.

 

निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. . सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. . शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

English Summary: Abandonment ideas of farmers; Sowing done by "Tarfuli"
Published on: 25 June 2021, 08:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)