News

तांदळाचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये जास्त करून वापरला जाणारा म्हणजे आंबेमोहोर हा देखील एक प्रकार आहे. महाराष्ट्र मध्ये बऱ्याच घरांमध्ये आंबेमोहर तांदळाचा आहारात समावेश केला जातो. तसा तो प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेला तांदूळ आहे.

Updated on 09 July, 2022 8:50 AM IST

 तांदळाचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये जास्त करून वापरला जाणारा म्हणजे आंबेमोहोर हा देखील एक प्रकार आहे. महाराष्ट्र मध्ये बऱ्याच घरांमध्ये आंबेमोहर तांदळाचा आहारात समावेश केला जातो. तसा तो प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेला तांदूळ आहे.

आंबेमोहोर तांदूळला तांदळाचा राजा असे देखील म्हटले जाते. परंतु या राजाचे सध्या भाव  प्रचंड प्रमाणात वधारले आहेत.

जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर तब्बल क्विंटल मागे 1000 ते 1500 रुपये भावामध्ये वाढ झाली आहे. यामागे तांदळाची परदेशातून वाढलेली मागणी  आणि देशांतर्गत तांदळाचा असलेला तुटवडा हे कारण सांगितले जात आहे.

हा झाला बाजारपेठेचा भाव, परंतु किरकोळ मार्केटचा जर विचार केला तर एक किलोचा दर 85 ते 90 रुपयांवर पोहोचला आहे.

नक्की वाचा:Spinach Benifits: पालक संजीवनी पेक्षा कमी नाही, या रोगांसाठी आहे रामबाण, वाचा

आंबेमोहोर तांदूळमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने भाववाढ होत असून या कालावधीत जवळजवळ प्रति क्विंटल पाचशे ते सातशे रुपये दरवाढ झाली आहे.

महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने हा तांदूळ मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यातून महाराष्ट्राला पुरवठा होतो. याबाबतीत या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हे पीक वर्षातून एकदाच घेतले जात असल्यामुळे आणि त्याचा येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन कमी केले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातून हा तांदूळ गायब होण्याच्या मार्गावर आहे. तसेच उत्पादन खर्चाचा विचार केला तर  तो जास्त असून हातात येणाऱ्या उत्पादनाचा कालावधी देखील जास्त आहे.

नक्की वाचा:बिझनेस आयडिया: कालांतराने दुप्पट कमाई देणारा व्यवसाय आता सुरु करा, जाणून घ्या माहिती

 त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आंबेमोहोर तांदळाच्या लागवडीकडे पाठ फिरवलेली दिसते. या तुलनेमध्ये कोलम तांदूळ अडीच महिन्यात पक्व होतो.

जर आपण या तांदळाच्या दरवाढी मागील कारणांचा विचार केला तर महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका व युरोप मधून या तांदळाला खूप मोठी मागणी आहे.

यासोबतच सौदी अरब आणि बांगलादेश देशांमधून देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच लहान बासमती तांदळाचे निर्यातीमध्ये झालेली वाढ हे देखील एक कारण आहे.

तसेच अंबेमोहर तांदळाचा कालावधी जास्त असल्याने आणि त्या तुलनेत कमी कालावधी आणि जास्तीचे उत्पादन असणाऱ्या कोलम तांदूळाकडे शेतकरी जास्त प्रमाणात वळला आहे.

नक्की वाचा:Processing:आरोग्याचा खजिना आणि उत्कृष्ट चवीचे आगार असलेला सेंद्रिय गुळ बनवा आणि कमवा मोठा नफा

English Summary: aanbemohor paddy market rate growth by 1000 to 1500 rupees per quintal
Published on: 09 July 2022, 08:50 IST