News

रेशन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणेच एक महत्त्वाचे शासन कागदपत्र आहे. शासकिय कामांसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. राज्य सरकारकडून रेशन कार्ड नागरिकांना दिले जाते. दरम्यान सप्टेंबर हा महिना रेशन कार्डधारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

Updated on 19 September, 2020 3:51 PM IST


रेशन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणेच एक महत्त्वाचे शासन कागदपत्र आहे. शासकिय कामांसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. राज्य सरकारकडून  रेशन कार्ड नागरिकांना दिले जाते.  दरम्यान सप्टेंबर हा महिना रेशन कार्डधारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या महिन्याअखेरपर्यंत आधार कार्ड रेशन कार्डशी जोडावे लागेल.  आधार कार्ड जोडणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे, या तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना रेशन द्यावे असे निर्देश सर्व  राज्यांना देण्यात आले आहे.  सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरात २३.५ कोटी रेशन कार्ड आहेत. यातील ९० टक्के कार्ड हे आधारशी लिंक करण्यात आले आहेत. 

 


दरम्यान शिल्लक असलेल्या रेशन कार्डधारकांना या महिन्याच्या अखेरपर्यंत आपले आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे.  जर आपण हे काम नाही केले तर आपल्याला मोठी अडचण उद्भभव शकते.  कारण जर आपण हे काम नाही केले तर आपले रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते किंवा तर रेशन कार्डमधील आपले नाव कापण्यात येऊ शकते.  दरम्यान या अडचणी येऊ नयेत यासाठी आधार कार्ड लवकरात लवकर रेशन कार्डशी जोडावे. युआयडीएआयच्या संकेतस्थळानुसार
, हे काम पुर्ण करण्यासाठी आपल्याला पीडीएस म्हणजे रेशन देणारे स्वस्त धान्य दुकानात जावे लागेल. त्यानंतर इतर पद्धतीने आधार कार्ड संलग्न करावे. 

काय आहेत आधार कार्ड जोडणीच्या पायऱ्या

स्वस्त दुकानात जाऊन आधारसह परिवारातील सर्व सदस्यांना  आधार कार्डची कॉफी आणि रेशन कार्डची एक कॉपी द्यावी.

घरातील प्रमुखाचा एक पासपोर्ट फोटो त्याला जोडावा.

कागदपत्र दिल्यानंतर पीडीएस अधिकारी बॉयोमेट्रिक मशीन किंवा सेंसरवर बोट ठेवण्यास सांगतील.  त्याच्या मार्फत आपली माहिती आणि  आधार नंबर मॅच केले जाईल.  त्यानंतर तुमचे कागदपत्र स्वीकारले जातील. त्यानंतर तुमच्या  नोंद असलेल्या मोबाईलवर रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर एक मेसेज येईल.

English Summary: Aadhar card is connected with ration card. The deadline is September 30. Hurry up
Published on: 19 September 2020, 03:49 IST