News

शेतकरी राजा जीवाची बाजी करून शेती करतो. अहोरात्र काळी आईची सेवा करतो तेव्हाकूठे त्याच्या ताटात दोन वखताचे जेवण येते. पण अनेकदा असे होते की कष्ट करून देखील निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याच्या पदरात काहीच पडत नाही. असेच काहीस घडलं आहे सोलापूर जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्यासोबत.

Updated on 16 December, 2021 12:47 PM IST

शेतकरी राजा जीवाची बाजी करून शेती करतो. अहोरात्र काळी आईची सेवा करतो तेव्हाकूठे त्याच्या ताटात दोन वखताचे जेवण येते. पण अनेकदा असे होते की कष्ट करून देखील निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याच्या पदरात काहीच पडत नाही. असेच काहीस घडलं आहे सोलापूर जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्यासोबत.

यंदा आपण सर्व्यानी निसर्गाचा लहरीपणा चांगलाच अनुभवला आहे. ह्या निसर्गाच्या अवकृपेचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे डिसेंबरच्या सुरवातीला अवकाळीने हाहाकार माजवला होता, ह्या अवकाळीमुळे सर्वात जास्त नुकसान फळबागांचे विशेषता द्राक्षे बागांचे बघायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळ येथील प्रतिभा चिकणे या महिला शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे

प्रतिभा यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर सोने गहाण ठेऊन आपल्या द्राक्षे बागासाठी पैसा उभा केला. त्यांनी आपल्या मुलासमवेत अफाट कष्ट केलेत आणि द्राक्षेबागांची जोपासना केली, मात्र अवघा एक हफ्ता द्राक्षे तोडणीसाठी बाकी असताना, अवकाळी नामक संकट ह्या चिकणे कुटुंबियांवर कोसळले आणि होत्याच नव्हतं झाले, हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी नामक राक्षसाने गिळींकृत केला. या अवकाळीमुळे त्यांच्या बागेत घडकूज होण्यास सुरवात झाली, तसेच देठालाच मुळे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलं जात आहे.

 

प्रतिभा चिकणे यांचा संघर्ष

प्रतिभा चिकणे यांनी पतीच्या निधनानंतर शेतीची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली. पतीनिधनाचे दुःख पचवून पुढची वाटचाल चालू ठेवणे हे तसे पाहता सोपे नव्हते पण त्यांनी खचून न जाता आपल्या मुलाच्या सोबत खांद्याला खांदा लावून शेतात कष्ट केले, त्यांनी द्राक्षे बाग जोपासण्यासाठी पैसे नसल्याने अक्षरशः सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. द्राक्षे बागेसाठी महागड्या औषधंची फवारणी करावी लागते, त्यांनी एवढा मोठा खर्च केला. त्यांना द्राक्षेबागातून चांगल्या उत्पन्नाची आषा होती पण देवाला काही औरच मान्य होते, अवकाळीच्या येण्याने या कुटुंबियांच्या आशेवर पाणी फेरले गेले. द्राक्षे बागांचे खुप मोठे नुकसान झाले, उत्पन्न तर सोडाच पण जे सोने गहाण ठेवले आहे ते सोडायचे कसे आता हा प्रश्न प्रतिभा यांच्यापुढे उभा राहिला आहे. मोठ्या संघर्षातून प्रतिभाजी यांनी आपला द्राक्षेचा मळा फुलवला होता पण नियतीने हे सार हेरावून घेतले, आणि त्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान करून ठेवले.

English Summary: a woman mortgage her gold for her grape farm but unseasonal rain ruin her all dreams and all vanish in one second
Published on: 16 December 2021, 12:47 IST