News

सोशल मीडियावर वायरल होणारे अनेक व्हिडीओ असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडीओ वायरल झाला. आजकाल बरेचजण बोलतात की, जगात आता माणुसकीच राहिली नाही, हा व्हिडियो अशा लोकांना पटवून देईल की जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे.

Updated on 04 July, 2022 5:12 PM IST

सोशल मीडियावर वायरल होणारे अनेक व्हिडीओ असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडीओ वायरल झाला. आजकाल बरेचजण बोलतात की, जगात आता माणुसकीच राहिली नाही, हा व्हिडियो अशा लोकांना पटवून देईल की जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावत गायीचे प्राण वाचवले आहे.

रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. गुडघाभर पाण्यातून लोक ये-जा करत होते. अशातच तेथून एक गायी जाऊ लागली. तिथे जवळच एक विजेचा खांब होता. त्या इलेक्ट्रीकच्या खांबातून वीजपास होत होती. त्यामुळे त्या गायीला विजेचा शॉक बसतो. मात्र सुरुवातीला हा शॉक कमी असल्याने तिला फार काही इजा झाली नाही मात्र जस जशी गाय पुढे जाऊ लागली तस तशी शॉकची तीव्रता वाढत गेली.

नवनियुक्त मुख्यमंत्री शेती बाबत 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये...


पुढे जाऊन गायीला शॉक सहन झाला नाही. आणि ती खाली पडली. आजुबाजूचे लोक बघून पुढे जात होते. मात्र एक दुकानदार गायीच्या मदतीसाठी पुढे सरसावला. आणि युक्तीने गाईला त्यातून बाहेर काढले. दुकानदार गाईच्या पायाला कपडा बांधून तिला मागे खेचतो. हे सगळं पाहून दुसरी एक व्यक्ती देखील त्याच्या मदतीला येते. आणि गायीचे प्राण वाचतात. हा व्हिडीओ कुठला आहे, हे काही कळालेले नाही. मात्र माणुसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ सध्या ट्वीटरवर चांगलाच वायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या
"ईकडे आड तिकडे विहीर", पिके तरतरली तर दुसरीकडे खतांच्या किंमती वाढल्या; सांगा शेती कशी करायची?
बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली

English Summary: A vision of humanity! Saved the life of a cow by risking his own life; What is the case read ..
Published on: 04 July 2022, 05:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)