News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक आगळ वेगळं आंदोलन केलं. एक जिवंत बकरा, कोंबडी, दारु, चखना घेऊन स्वाभिमानीचे कार्यकर्ते चक्क कृषी अधीक्षक कार्यालयातच दाखल झाले. आमच्याकडून पार्टी घ्या परंतू, बोगस जैविक कीटकनाशके त्याचबरोबर खतांच्या कंपन्यावर कारवाई करा, त्या विक्रेत्यांवर कारवाई करा अशी मागणी या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Updated on 28 September, 2023 11:24 AM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक आगळ वेगळं आंदोलन केलं. एक जिवंत बकरा, कोंबडी, दारु, चखना घेऊन स्वाभिमानीचे कार्यकर्ते चक्क कृषी अधीक्षक कार्यालयातच दाखल झाले. आमच्याकडून पार्टी घ्या परंतू, बोगस जैविक कीटकनाशके त्याचबरोबर खतांच्या कंपन्यावर कारवाई करा, त्या विक्रेत्यांवर कारवाई करा अशी मागणी या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस जैविक कीटकनाशके (Bogus Biological Pesticides) त्याचबरोबर खतांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या बोगस कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे.

परंतू, कृषी विभागाच्या वतीने यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांची बोगस खते आणि बियाणे देऊन फसवणूक प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची बोगस खते आणि बियाणे देऊन फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर येत असतात. दरम्यान मागील काही दिवसांत कृषी विभागाने केलेल्या कारवाईतून देखील बोगस बियाणे विक्रीचे प्रकार समोर आले आहेत.

शेतकऱ्यांनो PM किसानचा 15 वा हप्ता मिळणापूर्वी करा 'हे' काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित, जाणून घ्या..

त्यामुळे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान याआधी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी अधिक्षक कार्यालयासमोर नोटांची उधळण करत आंदोलन केलं होतं. जैविक कीटकनाशक कंपन्यावर कारवाई करण्यासाठी अनोख्या पद्धतीचा आंदोलन स्वाभिमानीच्या वतीनं करण्यात आलं होतं.

ब्रेकिंग! 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद, गैरव्यवहार होणार कमी...

परंतू कृषी विभागाच्या वतीने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसून, त्या बोगस जैविक कीटकनाशक कंपन्यावर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळं आज हे आंदोलन केलं आहे.यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनो कमी खर्चात मोठा नफा हवा असेल तर आजच मेंढीपालन सुरू करा, जाणून घ्या...

English Summary: A unique movement of swabhimani , party take action, Goats, chickens alcohol agriculture office...
Published on: 28 September 2023, 11:24 IST