News

‘माझी माती, माझा देश’ कलश यात्रेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते. “प्रत्येक गावा-गावातून, घरातून नागरिक ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाशी जोडलेले आहेत, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Updated on 27 October, 2023 4:22 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. “भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. आम्ही हा पुतळा मुंबईतून पाठवला आहे. पाकिस्तानला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची भीती वाटेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

‘माझी माती, माझा देश’ कलश यात्रेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते. “प्रत्येक गावा-गावातून, घरातून नागरिक ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाशी जोडलेले आहेत, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लंडनवरुन देखील महराष्ट्रात आणली जाणार आहेत. ही देशासाठी अभिमानास्पद आणि कौतुकाची बाब आहे. मात्र याबाबत काहीजण शंका उपस्थित करत आहेत. तर वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, "काही लोक सरकारच्या कामावर रोष व्यक्त करत आहेत. त्यांनी यावर आक्षेप घेतला हे दुर्दैव आहे. सांस्कृतिक विभाग आपल काम करत आहेत. वाघनखांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली प्रत्येक वस्तू आम्ही आणण्याचा प्रयत्न करु" असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

English Summary: A statue of Chhatrapati Shivaji will be erected on the India-Pakistan border Chief Minister's big announcement
Published on: 27 October 2023, 04:22 IST