बैलगाडा शर्यत हा एक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. यामुळे शेतकरी आपल्या बैलांना जीवापाड जपत असतात. असे असताना आता बैलगाडा शर्यतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या बैलगाडा शर्यत हा अनेकांचा महत्वाचा विषय बनला आहे. आता बैलगाडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
याबाबत बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून तामिळनाडू सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचा कायदाही वैध असल्याचं म्हटलं आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा रस्ता मोकळा झाला आहे.
यामुळे यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर एक मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बैलगाडा थरार, मेहनत आणि त्यासाठी संपूर्ण लागणारी तयारी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणार आहे.
काँग्रेसच ठरलं! अखेर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हा दिमाखदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आता बैलगाडा शर्यतीसाठी काही अडचण येणार नाही.
कांद्याला बाजार नाही, आता मिळणार कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान, फलोत्पादन मंत्र्यांची महिती
महाराष्ट्राबरोबर इतर राज्यात बैलगाडा शर्यत, जलीकट्टू, कंबाला यांना परवानगी देणाऱ्या कायद्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यात सध्या जत्रा यात्रा सुरू असून यामध्ये बैलगाडी शर्यत आयोजित केली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होत असतात. तसेच शेतकरी ही परंपरा जपत आहेत.
भारतातील सर्वात कमी किमतीचा आणि सर्वात जास्त ताकदवान ट्रॅक्टर, जाणून घ्या..
ब्रेकिंग! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत दिला महत्त्वाचा निकाल
शेतकऱ्यांना पेरणीआधी सरकार १० हजार देण्याच्या तयारीत? कृषिमंत्र्यांचे मोठे वक्तव्य..
Published on: 19 May 2023, 09:45 IST