महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले की कबड्डी, खो-खो, (Kabaddi, kho-kho,) लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती. (Wrestling)
छोट्या उस्ताद याने विक्रम केला आहे. वयवर्षे १०, कुस्तीची आवड आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याचं स्वप्न पाहणारा, मूर्ती लहान कीर्ती महान असलेल्या आपल्या भोसरीच्या स्वराज राहुल लांडगे याने अवघ्या २६ मिनिटात १००० जोर मारण्याचा विक्रम केला आहे. स्वराज बाळा, तुझं मनापासून अभिनंदन! तू महाराष्ट्र केसरी व्हावं, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
कुस्ती खेळाचा इतिहास
राजे महाराज्यांपासून ते मुघल साम्राज्य आणि आज पर्यंत कुस्ती हा खेळ खेळला जातो. कुस्ती हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ आहे. पूर्वीकाळी याला ‘मल्ल युद्ध’ म्हणून ओळखल्या जायचे. या खेळासाठी दांडग्या शरीरयष्टी सोबतच चपळ आणि तेज बुद्धिमत्तेची गरज असते.
महाराष्ट्रामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ ही कुस्तीची राज्य स्तरावरील स्पर्धा भरवण्यात येते. इतकेच नव्हे तर गावा गावात जत्रा आणि काही विशेष प्रसंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते.
कुस्तीचे प्रशिक्षण
कुस्ती शिकविणाऱ्या प्रशिक्षकांना गुरु किंवा उस्ताद असे म्हणतात. ज्या ठिकाणी कुस्ती खेळाचे प्रशिक्षण दिले जाते त्या जागेला आखाडा म्हटल्या जाते. आखाड्यातील लाल मातीला तेल, दुध, तूप आणि ताक टाकून मऊ केल्या जाते. या मातीवर रोज हलके पाणी शिंपडल्या जाते. यामुळे माती निर्जंतुक तर होतेच सोबतच खेळाडूंना दुखापत देखील होत नाही.
खेळासाठी उपयुक्त असलेले व्यायाम येथे शिकविल्या जातो. तसेच विविध डाव-पेच आणि पकड सुद्धा शिकविल्या जाते. मल्लांना विशिष्ट खुराक म्हणजे खाद्य या बद्दल सांगितले जाते. तसेच कुस्तीताला एक पूरक व्यायाम प्रकार मल्लखांब बद्दल देखील प्रशिक्षण दिल्या जाते.
कुस्ती या खेळात अनेक डाव-पेच असतात जसे की, धोबीपछाड, उभा कलाजंग, आतील टांग, निकाल इ. खेळाडू कुठला डाव वापरून समोरील खेळाडूला चित करतो हे पाहण्यासारखे असते. यातील काही डावांना अधिक गुण दिले जातात.
Published on: 30 May 2022, 02:33 IST