पुणे
टोमॅटोच्या उत्पादनात घट झाल्यामुळे टोमॅटोच्या दराने चांगलाच उच्चांक गाठला आहे. दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तर टोमॅटो उत्पादकांना मात्र दरामुळे चांगला आधार मिळाला आहे. या दरामुळे पुण्यातील जुन्रर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक तुकाराम गायकर हे शेतकरी करोडपती झाले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे जास्त उत्पादन झाल्यामुळे टोमॅटोचे दर घसरले होते. तसंच उोत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली होती. तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यांवर टोमॅटो फेकून दिले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावात तुकाराम गायकर यांची शेती आहे. गावाच्या बाजूला धरण असल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रायकर यांनी टॉमॅटोची लागवड केली होती. मात्र त्यानंतर टोमॅटोच्या किंमती घरसल्याने त्यांनी टोमॅटो फेकून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा १२ एकरात टोमॅटोची लागवड केली. आणि त्यांना अखेर फळ मिळालं.
दरम्यान, ११ जून ते १८ जुलै या कालावधीत टोमॅटोच्या विक्रीतून रायकर यांनी तीन कोटी रुपये कमावले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे टोमॅटोचे 18 हजार क्रेट (प्रत्येकी क्रेट 20 किलो ) तीन कोटी रुपयांना विकले आहेत.
Published on: 21 July 2023, 02:59 IST