अनेक शेतकरी आपल्या शेतात पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक नवनवीन प्रयोग करतात. तसेच यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे देखील कमवतात. असे असताना असेच काहीसे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने केले आहे. यामुळे या युवा शेतकऱ्याची परिसरात मोठी चर्चा आहे. जातेगाव येथील विठ्ठल उमाप या युवा शेतकऱ्याने पॉलिहाऊस शेतीतून तब्बल 30 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
त्याने आपल्या पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीचे उत्पन्न घेतले आहे. शिमला मिरचीने या युवा शेतकऱ्याच नशीबच बदलून टाकले आहे. उमाप यांनी एक एकर पॉलिहाऊस शेतीमध्ये कलर कॅप्सिकम सिमला मिरचीच्या 12 हजार रोपांची लागवड केली आणि या सिमला मिरचीला 70 रुपयांपासून जास्तीत जास्त 250 रुपयापर्यंतचा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे याचा मोठा फायदा झाला आहे. याला मोठा खर्च असल्याचे शक्यतो अनेक शेतकरी याकडे वळत नाहीत, मात्र पुढे यामधून चांगले पैसे आपल्याला मिळतात.
या शेतीचे अनेक फायदे आहेत. भारतात पारंपारिक शेती एकूण उत्पादनापैकी 95% आहे. याचे कारण असे की भारतातील शेतकरी जमिनीचे वैयक्तिक मालक आहेत. यामुळे केवळ मोठ्या शेतकरी किंवा कंपन्यांना पॉलिहाऊस शेती करणे परवडते. यामुळे याकडे सर्वसामान्य शेतकरी वळत नाहीत. मात्र याची शेती फायदेशीर आहे. याचे कारण म्हणजे यामधील पालेभाज्यांचे मोठी मागणी असते, तसेच परदेशात देखील या भाज्या मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जातात. यामुळे यामधून चांगले पैसे मिळतात.
यामध्ये औषधे, पाणी या गोष्टी प्रमाणात लागतात. यामुळे याचा खर्च देखील कमी होतो. भाज्या आणि फुलांमध्ये 90% पाणी असल्याने ते इतर भाजीपाला आणि फुलांच्या बाहेरील उत्पादनापेक्षा गुणवत्तेत जास्त आहे. यामुळे यामधील भाज्या खाण्यास अनेकांचा कल असतो. या शेतकऱ्याने देखील असेच काहीसे करून ३० लोकांचे उत्पादन घेतले आहे. त्याचे शेत बघण्यासाठी अनेक शेतकरी आता भेट देत आहेत. यामध्ये नवीन प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. अशाप्रकारे सुरुवातीला काहीसे पैसे गुंतवले तर यामधून देखील फायदा होऊ शकतो.
Published on: 17 January 2022, 11:42 IST