News

फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावे तसेच फळांची निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे.

Updated on 24 January, 2022 1:30 PM IST

फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळावे तसेच फळांची निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून डाळिंब या फळाची निर्यात वाढावी यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी करावी यासाठी अभियान राबवले जात आहे. याचाच परिणाम म्हणून यावर्षी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून डाळिंबाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशाची डाळिंब निर्याती मधील  परिस्थिती

 जर भारताचा विचार केला तर गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातून युरोपीय देशांमध्ये तसेच अन्य देशात डाळिंबाची निर्यात केली जाते. मागच्या वर्षीचा विचार केला तर देशातून 2400 शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी केली होती. डाळिंब फळ पीक हे वातावरणाला संवेदनशील असल्यामुळे गेल्या चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर येत आहे तरीसुद्धा शेतकरी व्यवस्थित आणि काटेकोर नियोजन करून डाळिंबाच्या बागा यशस्वी करत आहेत. आतापर्यंत संपूर्ण देशात डाळिंब निर्यात करण्यासाठी 2432 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

चालू हंगामात तीन हजारांपेक्षा अधिक डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी होण्याची शक्यता आहे.मागच्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील निसर्गाचा फटका डाळिंब हळद पिकाला बसला आहे. तरी डाळिंबाचे निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आव्हान  तसेच त्यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठीकृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक नोंदणी सुरू झाली आहे.                        

English Summary: a possibility of growth pomegranet export this year and status of pomegranet export
Published on: 24 January 2022, 01:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)