जगात अनेक ठिकाणी वेगवेगळे चमत्कार बघायला मिळतात. असे असताना संतराम सुवर्णकार यांच्या घरी गायींने जुळ्या वासरांना जन्म दिल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. यामुळे अनेकजण त्यांच्या घरी येत आहेत. संतराम सुवर्णकार यांना तीन एकर जमीन असून, या शेतीवरच ते आपला उदरनिर्वाह करतात. गायीने जुळ्या वासरांना जन्म देणे अशा घटना क्वचितच घडतात. असे झाले तरी वासरांना धोका असतो पण ही दोन्ही वासरे ही सदृढ आहेत. यामुळे त्यांना कसलाही धोका नाही.
दोन्ही नर असल्याने शेतकऱ्याला याचा अधिकचा फायदा होणार असल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी केंद्रे यांनी सांगितले आहे. अशा घटना फार कमी बघायला मिळतात. यामुळे सुरुवातीला अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता. मात्र नंतर जेव्हा अनेकांनी प्रत्यक्षात बघून त्यांना हे खरे वाटले. सुवर्णकार यांच्या गायीने दोन वासरांना जन्म दिला ही गोष्ट अवघ्या काही वेळेत पसरली. जे शेतकरी आहेत त्यांनी नेमकी वासरांचा तब्येत कशी आहे? कसंकाय हे शक्य झाले हे पाहण्यासाठी थेट संतराम सुवर्णकार यांचे घर गाठले. यामुळे मोठी गर्दी झाली होती.
ही दोन्ही वासरे एकाच रंगांची आणि नर जातीची आहेत. गाईचे वय पाच वर्ष असून, बांधा सरळ आहे. तर ही दुसरी वेत असल्याची माहिती सुवर्णकार कुटुंबांनी दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर गाई पाळल्या जातात. मात्र अशी घटना सारखी बघायला मिळत नाही. असे असताना गावकऱ्यांनी सुवर्णकार कुटुंबियांनी गावातील हनुमान मंदिराची आयुष्यभर सेवा केली. यामुळे याचाच प्रसाद मिळाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या आईने देखील हनुमंताची मनोभावे सेवा केली होती.
आता संतराम सुवर्णकार हे शरीराने थकले असले तरी त्यांचे अख्ख कुटुंब या मंदिराची नित्य नियमाने दररोज पूजापाठ करत असते. यामुळे याची चर्चा गावात आहे. दरम्यान रविवारी सकाळच्या दरम्यान या गाईने वासरांना जन्म दिला असून डॉक्टरांनी देखील ही वासरे सदृढ असल्याचे म्हटले आहे. याचे फोटो विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी या शेतकऱ्याची चर्चा आहे.
Published on: 07 March 2022, 03:32 IST