उत्पादन वाढण्यासाठी शासकीय स्तरावर सर्व प्रयत्न सुरू आहेत. आता पर्यंत राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान तसेच अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत मात्र रब्बी हंगामात एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे स्पर्धेची. रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी जास्त पीक घेतले आहे त्या शेतकऱ्यांना शासनामार्फत बक्षीस दिले जाणार आहे. हंगामातील उत्पादन चांगल्या प्रकारे वाढावे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे. या स्पर्धेमधे अशा काही अटी आहेत त्या अटींचे पालन करून शेतकऱ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्याची शेवटची मुदत ३१ डिसेंम्बर आहे.
काय आहेत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अटी?
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याला जवळपास १० एकर क्षेत्रावर पीक घ्यावे लागणार आहे जो की पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा,करडई ,जवस, तीळ या पिकांचा समावेश असावा लागणार आहे. जर शेतकऱ्याला या स्पर्धेतुन माघार घ्यायची असेल तर पीक कापणी आधी १५ दिवस संबंधित अधिकाऱ्याला लेखी सांगावे लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी होयचे असेल तर ३०० रुपये फी असणार आहे तर अर्ज करण्याची तारीख ३१ डिसेंम्बर पर्यंत आहे.
असे असणार बक्षीसांचे स्वरुप...
राज्य, विभाग, जिल्हा तसेच तालुका पातळीवर ही स्पर्धा राहणार असून पिकाप्रमाणे प्रथम, द्वितीय तसेच तृतीय अशा पद्धतीने बक्षिसांचे स्वरूप राहणार आहे. तालुका पातळीवर पाहायला गेले तर प्रथम क्रमांक ला बक्षीस ५ हजार रुपये तर दुसरे बक्षीस ३ हजार आणि तिसरे बक्षीस २ हजार रुपये असे असणार आहे. जिल्हा पातळीवर पाहायला गेले तर प्रथम क्रमांक ला बक्षीस १० हजार रुपये तर दुसरे बक्षीस ७ हजार आणि तिसरे बक्षीस ५ हजार रुपये असे असणार आहे. विभागीय पातळीवर पाहायला गेले तर प्रथम क्रमांक ला बक्षीस २५ हजार रुपये तर दुसरे बक्षीस २० हजार आणि तिसरे बक्षीस १५ हजार रुपये असे असणार आहे. विभागीय स्तरावर पाहायला गेले तर प्रथम क्रमांक ला बक्षीस ५० हजार रुपये तर दुसरे बक्षीस ४० हजार आणि तिसरे बक्षीस ३० हजार रुपये असे असणार आहे.
या स्पर्धेची काय आहेत वैशिष्ट्ये...
या स्पर्धेत त्याच शेतकऱ्याना भाग घेता येणार ज्यांच्या नावावर जमीन आहे आणि ते स्वतः शेतात कष्ट करत आहेत. एका शेतकऱ्याला एका पेक्षा जास्त स्पर्धेत सहभागी होता येईल. आदिवासी तसेच सर्वसाधारण जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेता येणार आहे. एका तालुक्यामधून जवळपास १५ शेतकऱ्यांचे अर्ज येणे अपेक्षित आहे नाहीतर स्पर्धा रुद्ध करून पैसे माघारी देण्यात येतील.
स्पर्धेसाठी नोंदणी कुठे करायची?
या स्पर्धत सहभागी होण्यासाठी कृषी कार्यालयाकडून एका अर्ज देण्यात येईल जे की या अर्जासोबत ३०० रुपये फी तसेच ७/१२ अ उतारा, जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे लागणार असून हा अर्ज ३१ डिसेंम्बर च्या आधी तालुका कृषी कार्यालयात सबमिट करावा लागणार आहे.
Published on: 17 December 2021, 05:37 IST