राज्यातील विविध भागात हवेची गुणवत्ता घसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबई देशातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. आज राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
या बैठकीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी रस्त्यांवर पाण्याचा मारा करावा त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे आणि पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत. प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे. बांधकाम साईटवर स्मोग गन स्प्रिंकलर बसवा. Mmrda च्या बांधकाम साईट धुळमुक्त करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
संपूर्ण राज्यातील महापालिकेच्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे, पर्यावरण विभागाला दररोज मॉनिटरींग करा, असं सांगितलं आहे. हे वायू प्रदूषणव तात्काळ कमी झालं पाहिजे. त्यासाठी शहरी भागातही झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्व पातळीवरच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ होईल. नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: 09 November 2023, 05:09 IST