यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन सारखे महत्त्वाचे पीक पाण्यात गेले. परंतु खरीप हंगामातील शेवटचे पिक असलेले तुर पीकशेतकऱ्यांच्या हातात चांगले आले. सध्या तुरीची काढणी आणि मळणी चे काम जोरात सुरू आहे.
यावर्षी शासनाने तुर खरेदी साठी हमीभाव केंद्रे सुरू केली परंतु हमीभाव केंद्र पेक्षा खुल्या बाजारांमध्ये तुरीला जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्र अपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुर विक्री साठी जास्त प्रमाणात आणत आहेत. या पार्श्वभूमीवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 28 जानेवारीला तुरीची विक्रमी सहा ते साडेसहा हजार क्विंटल इतकी आवक झाली. त्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आज 31 जानेवारीपासून बाजार समितीत तुरीची व्यवहार होतील अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.
एकाच दिवसात तुरीची एवढी विक्रमी आवक झाल्याने एका दिवसातच मोजमाप आणि व्यवहार करणे अशक्य असल्यामुळे बाजार समितीने दोन दिवस शेतकऱ्यांना बाजारात मालनआणण्याचे आवाहन केले होते. खरीप हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आता सोयाबीन आणि कापूस नंतर तूर पीक हे शेतकऱ्यांचा आधारस्तंभ ठरणार आहे. हवामान बदलाचा आणि तुरी वर आलेला मर रोगामुळे तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात तुरीच्या आवकेमध्ये वाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली परंतु तरीही तुरीला चांगला दर मिळाला आहे. जर 28 तारखेचा विचार केला तर तुरीला किमान पाच हजार 100 तर कमाल सहा हजार 695 इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे.
Published on: 31 January 2022, 06:45 IST