करमाळ्यातील बिटरगाव वांगी गावातील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कस असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाजारात ८० रुपयांना विकलं जाणारं कलिंगड सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये (Solapur Krushi Utpanna Bazar Samiti) मात्र अवघ्या 80 पैशांना विकलं गेलं.
तीन टन कलिंगडला केवळ 3400 रुपये मिळाल्याने शेतकरी निराश झाला आहे. 3 टन कलिंगड विक्रीला नेलेल्या शेतकऱ्याला 4560 रुपयांची पदरमोड करण्याची वेळ आली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये सध्या सुरु असलेली क्रेट पद्धत बंद करुन किलोवर कलिंगडाची खरेदी करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे साडे चार हजार रुपये, हमाली 960 रुपये, असा एकूण सात हजार नऊशे साठ रुपये खर्च आला. या कलिंगडची पट्टी मात्र केवळ 3400 रुपये आल्याने रोडगे याना धक्काच बसला आहे. मालाची पट्टी पाहून औषधाची बाटली विकत घेण्याची इच्छा होत असून आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
कर्मचारी झाले आता राज्यातील तहसीलदार संपावर
त्यांनी शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी रामभाऊ रोडगे यांनी केली आहे. रामभाऊ रोडगे यांची तीन एकर शेती असून यात त्यांनी दोन एकरावर कलिंगडची लागवड केली आहे. त्यांना यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला. यातील तीन टन कलिंगड त्यांनी विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते.
आता नुकसान झालेल्या पिकांची सरकार करणार खरेदी, 'या' सरकारची मोठी घोषणा..
याआधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दराच्या बाबती असेच काहीसे झाले होते. 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आले आहेत.
उस्मानाबादी शेळीपालनाने शेतकरी होऊ शकतो श्रीमंत, जाणून घ्या काय आहे खासियत
कृषिपंपांच्या वीज दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना..
सिबिल स्कोअरची अट न लावता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, सरकारचा आदेश बँका पाळणार का?
Published on: 04 April 2023, 04:54 IST