पोस्ट ऑफिसची नवी योजना आहे , जी आपल्या जमा झालेल्या राशीतून मोठी रिटर्न देते. याशिवाय जमा झालेल्या पैश्यावर कोणत्याच प्रकारचा धोका नसल्याने ही योजना खूप फायदेमद आहे. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस योजनेवर सरकारचं नियंत्रण असून सरकारचं आपल्या पैश्यावर व्याज ठरवत असते, यामुळे ग्राहकांना झालेल्या राशीवर चांगल व्याज मिळत असते.
या योजनेचे नाव आहे, राष्ट्रीय बचत पत्र. बचतीमधील ही योजना सर्वोत्तम अशी योजना मानली जाते. या योजनेचा काळ ५ वर्षाचा असतो.याची मॅच्युरिटी काळ हा पाच वर्षाचा असतो. या योजनेत १ एप्रिल २०२० पासून व्याजदर ६.८ टक्के निर्धारित करण्यात आले आहे. उदाहरणार्थ जर आपण आपल्या खात्यात १ हजार रुपये जमा केल्यास पाच वर्षात मॅच्युरिटी काळानंतर तुम्हाला १३८९.४९ रुपये जमा होतील. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही १ हजार रुपयांपासून खाते सुरू करू शकतात. किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांनी हे खाते सुरू करू शकतात.
पाच वर्ष मॅच्युरिटी काळ पुर्ण होत आपल्या मुदल रक्कमेला व्जाज जोडून मिळत असते. जर तुम्ही ५ लाख रुपया जमा केले असतील तर ५ वर्ष जमा केलेली राशी ६ लाख ९८ हजार ५१४ रुपये होतात. आणि जमलेल्या पाच लाख रुपयांच्या राशीमध्ये साधरण २ लाख रुपये मिळतात. म्हणजेच पाच वर्षात मुदल जशीस राहते आणि दोन लाख रुपये अधिक रुपयांचा व्याज आपल्याला मिळत असतो. शिवाय आपण जमा केलेल्या रक्कमेवर कोणताच धोका नसतो.
एनएससी राष्ट्रीय बचत पत्रचे फायदे
यात कमीत कमी रक्कमेत तुम्ही गुंवणूक करू शकतात. १०० रुपयांचीही गुंतवणूक तुम्ही करु शकतात.
एनएससी आपल्या खातेधारकांना रिटर्नची हमी देते. दरम्यान हे आपल्या नियमित उत्पन्नाचा स्रोत्र तयार केले जाऊ शकते.
एनएससीचा मॅच्युरिटी कमी कालावधीचा असतो.
जमा केलेली रक्कमेची मॅच्युरिटी झाल्यानंतर खातेधारकास पुर्ण पैसे दिले जातात. एनएससीमधून मिळणाऱ्या पैश्यावर टीडीएस कापले जात नाही.
एनएससीची राशीला मॅच्युअर होण्याआधी काढू शकत नाहीत. पण यात जमा केलेल्या राशीवर कर्ज देण्याची सुविधा दिली जाते.
एनएससीच्या अंतर्गत नॉमिनी बनवण्यास सुविधा मिळते. यात कुटुंबातील कोणताही सदस्य , तर अल्पवयीन नॉमिनीही बनवू शकतो.जर खातेधारकाचा अकाली निधन झाले तर पुर्ण पैसा हा नॉमिनीला मिळत असतो.
गारंटी रिटर्न वाली योजना
राष्ट्रीय बचत खाते मध्ये रिटर्नची गारंटी आहे. मध्यमवर्गीय लोकांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेतून आपल्याला करातून सूट मिळते. यात १.५ लाख रुपये जमा केल्यास आपल्याला करातून सूट मिळते. या योजनेतील व्याज कमी - जास्त होत नाही.
Published on: 23 February 2021, 01:06 IST