News

राज्यात सध्या विरोधक आणि सत्ताधारी कधी भोंगा प्रकरणावरून तर कधी जातीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे एक ना अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत.

Updated on 11 May, 2022 6:06 PM IST

Beed : राज्यात सध्या विरोधक आणि सत्ताधारी कधी भोंगा प्रकरणावरून तर कधी जातीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे एक ना अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत. अवकाळी पावसाने तर सर्वसामान्य माणसांबरोबर शेतकऱ्यांचे अमाप नुकसान केले आहे. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना बराच आर्थिक फटका बसला आहे.

अवकाळी पाऊस, पाण्याच्या पाठपुरवठ्याची कमतरता,पीकाला भाव नाही, या ना त्या कारणाने पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं सत्र चालूच आहे. अशीच एक महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली आहे. कारखाने ऊस नेत नसल्याच्या नैराशेतून एका शेतकऱ्याने स्वतः उसाचा फड पेटून दिला आणि उसाच्या फडातच आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील उसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस पिकाची लागवड केली होती. यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आपल्याला चांगला नफा होईल अशी आशा ऊस उत्पादक शेतकरी बाळगून होता.

कॅलिफोर्नियाचा युवकाचे पुण्याच्या तरुणीशी लग्न आणि ‘पुढे’...

मात्र कारखानदार आणि शेतकरी यांच्यात संवाद नसल्याने ऊस पिकाचे हजार हेक्‍टर क्षेत्र अजूनही तोडणी विना उभं होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत सुटला आणि त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे राहणाऱ्या नामदेव जाधव या शेतकऱ्याने कारखाने ऊस नेत नसल्यामुळे हे पाऊल उचललं. या नैराश्यातून शेतकरी नामदेवने यांनी आपला ऊस स्वतः पेटवून दिला.

आणि त्यानंतर आपण ऊस पेटवला आहे हे त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करुन सांगितलं. नातेवाईकांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला.
मात्र नामदेव हे पूर्णपणे हताश झाले होते. त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेव यांच्या आत्महत्येने संपूर्ण गाव हळहळलं.

उसाचा प्रश्न गंभीर होत असताना शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत, परिणामी शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नसल्याचं गावातील इतर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्यपरिस्थितीला प्रशासन आणि कारखानदारांनी यावर लवकरात लवकर मार्ग काढायला हवा किमान शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी एवढी मदत सरकारने तात्काळ जाहीर करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या:

IMD Alert : असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला; जोरदार पावसाची शक्यता
नादच खुळा...! एकीकडे CA तर दुसरीकडे पशुपालन व्यवसायात आहेत अग्रेसर

English Summary: A heart wrenching event! First lit the cane and then ...
Published on: 11 May 2022, 06:06 IST