सद्यपरिस्थितीत वातवरण व बदलते हवामान तसेच जमिनीची सुपीकता घटत चालली असून कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. परंतु या सर्व समस्येवर तोडगा काढत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बाबासाहेब गोरे यांनी एकरी तब्बल २५ टन कांद्याचे उत्पादन मिळाले आहे. या यशस्वी प्रयोगाची राहुरी कृषी विद्यापीठानेही दखल घेतली असून या तंत्रज्ञानाचा आता विद्यापीठाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
सध्या वाढती लोकसंख्या पाहता शेतीचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे कमी शेतीमध्ये जास्त पिके घेऊन फायदा वाढवायचा असेल तर शेतीची उत्पादकता वाढणे गरजेचे आहे व त्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान तसेच कल्पनांची आवश्यकता आहे. राज्यातील लाखो शेतकरी कांदा पिकवतात यामध्ये विशेष करून अहमदनगर नाशिक या जिल्ह्यात कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
कांद्याचे प्रति एकर उत्पादन सरासरी १२ ते १५ टन उत्पादन होते. मात्र, नियोजनबद्ध शेती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास उत्पादन वाढवता येते हे या शेतकर्याने दाखवून दिले आहे. नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील राजुरी येथील शेतकरी बाबासाहेब गोरे यांनी कांदा लागवड करण्यापूर्वी शेतजमिनीची व्यवस्थित मशागत करून घेतली. आणि अतिशय नियोजन बद्ध रोप लागवड करून एक एकरात २५ टनापेक्षाही जास्त उत्पन्न मिळवले.
या प्रयोगाची दखल राहुरी कृषी विद्यापीठाने घेतली आहे. विद्यापीठ त्यांच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले. गोरे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यांनी डाळिंबावरील संशोधन केले असून, त्यांना डाळींबरत्न म्हणूनही ओळखले जाते.
बाबासाहेब गोरे म्हणतात की त्यांचे वडील पारंपारिक शेती करायचे, पण मी आता बदल करत आहे, नफा कसा मिळवता येईल आणि इतर शेतकरी कसे सधन होतील यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
ऊस उत्पादनवाढीत मेन फॅक्टर आहे गंधक; ठरेल ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक
Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकाने काढली गाढवाला बांधून गावभर धिंड, कारणही आले समोर.
Published on: 25 April 2022, 03:05 IST