यावर्षी शेतकरी राजा अनेक समस्यांना तोंड देत आहे, खरीप हंगामातील जवळपास सर्वीच पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून गेलीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले, पदरी उत्पन्न नसताना देखील शेतकरी राजाने एक अभेद्य साहसाचे उदाहरण जगासमोर मांडले आहे. खरीप हंगामात निसर्गाची अवकृपा तर होतीच शिवाय जेव्हा त्यांच्या हक्काचे विमाचे पैशाचा विषय आला तेव्हा देखील विमा कंपन्यानी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे कमी होते की काय म्हणुन अजून काल परवाच खतांच्या किंमतीत बेसुमार वाढ घडवून आणण्यात आली. म्हणजे आसमानी तसेच सुलतानी अशा दोन्ही संकटाचा बळीराजा दटून सामना करत आहे, बळीराजा फक्त सामनाच नाही करत तर नव्याने अजून उभारी देखील घेत आहे.
याचेच एक साजेसं उदाहरण आता समोर आलं आहे शेतकरी राजा आता शेतीत नवीन प्रयोग करू पाहत आहे, नेहमीसारखे एकाच पीकपद्धतीचा अवलंब न करता आता आधुनिक पीकपद्धती अंगीकारत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी आता नवीन पीकपद्धती स्वीकारतांना दिसत आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क काळ्या भाताची लागवड करून सर्व्यांना विचार करायला भाग पाडले आहे. जिल्ह्यातील फुलग्री शिवारातील शेतकऱ्यांनी हे अचंबित करून सोडणारा प्रयोग केला आहे. याचा शेतकऱ्याच्या उत्पन्नात काही फरक पडेल की नाही हे गुपित तर भविष्यात दडले आहे मात्र ह्या प्रयोगाने कृषी विभागाला विचार करायला भाग पाडले आहे एवढे नक्की.
असा प्रयोग राज्यात पहिल्यांदा झाले आहे असे नाही याआधी पश्चिम महाराष्ट्रात हा प्रयोग बघायला मिळाला होता, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात काळ्या भाताची लागवड केली गेली होती तसेच मराठवाड्यातच नांदेड विदर्भातील अकोल्यात देखील याची लागवड बघायला मिळाली होती. यंदा भातासाठी पोषक वातावरण औरंगाबाद जिल्ह्यात बघायला मिळाले म्हणूनच फुलंग्री शिवारातील कृष्णा फलके यांनी काळ्या भाताची लागवड करण्याचा निर्णय घेतला, काळ्या भाताची लागवड ही अगदी आपल्या साध्या भातप्रमाणे असल्याचे कृष्णा यांनी यावेळी सांगितले.
पण ह्या काळ्या गव्हातून उत्पादन कसे मिळते याकडे कृष्णा समवेत कृषी विभागाचे देखील लक्ष लागले आहे. कृष्णा यांचा हा प्रयोग निश्चितच शेतकऱ्यांच्या मनात कुतूहल निर्माण करणारा आहे, आणि कृष्णा यांच्या या लागवडीच्या यशावर काळ्या भात शेतीचे भवितव्य अवलंबून असेल असे चित्र एकंदरीत दिसत आहे.
Published on: 18 December 2021, 06:58 IST