गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने एक मोठा निणर्य घेतला आहे. गव्हाची निर्यात बंदी करण्याचा हा निर्णय होता, यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आता जगासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गव्हाचे दर वाढले आहेत.
गहू उत्पादक देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या हंगामात इतर देशात खराब हवामानाचा फटका बसला. गव्हाचं उत्पादन कमी झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला. मात्र भारतात गहू उत्पादन चांगलं झालं. यामुळे मागणी वाढली आहे. गव्हाची कमतरता भारतानं भरून काढली. असे असताना मोदींनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
गव्हाचे दर वाढले आहेत. त्यामुळे मोदी सरकारनं गव्हाची निर्यात बंद केली आहे. असे असताना आता गव्हासाठी शिकागोमध्ये १२.४७ डॉलर मोजावे लागत आहेत. मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर गव्हाचे दर ५.९ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या दरात जवळपास ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे या देशांना याचा फटका बसता आहे.
रशिया आणि युक्रेन जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठे गहू निर्यातदार देश आहेत. असे असताना या देशात परिस्थिती खराब असल्याने याचा मोठा फटका याठिकाणी बसत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असल्यानं त्याचा परिणाम गव्हाच्या पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे आत ही परिस्थिती कधी सुधारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गव्हाच्या दरांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही परिस्थिती बडणार की अजूनच बिघडणार याचा अंदाज लावणे सध्या कठीण जात आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णयाची अंबलबजावणी सध्या सुरु करण्यात आली आहे. यामुळे भारतात गव्हाचे दर कमी होतील.
महत्वाच्या बातम्या;
मोठ्या लोकांना सोडता आणि शेतकऱ्यांना पिडता, न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला झापले
बातमी कामाची! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो कांदा बिहार केरळमध्ये विका, व्हाल मालामाल...
खतांबाबत शेतकऱ्यांची चिंता मिटली, खरीप हंगाम आढावा बैठकीत अजितदादांचा मोठा निर्णय
Published on: 17 May 2022, 04:17 IST