News

स्थानिक अमडापुर येथे कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

Updated on 16 September, 2022 8:16 PM IST

स्थानिक अमडापुर येथे कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर, श्री बाबुराव मारोती कांबळे यांच्या शेतावर दिनांक 13सप्टेंबर 2022 रोजी शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती.सदर शेतीशाळेत सोयाबीन पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, कीड व अळी व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व समजावून सांगताना ,कामगंध

सापळ्यांचे महत्व समजावून सांगताना ,कामगंध सापळे शेतामध्ये कशाप्रकारे उपयोगी पडतात, Explaining the importance of traps, how odor traps are useful in the field,ते कसे बसवायचे याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कृषी सहायक श्री योगेश सरोदे यांनी केले शेतकऱ्यांच्या शेतामद्धे हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अळीचा प्रादुर्भाव ओळखायचा असल्यास शेतामध्ये खळगे खळग्याने पीक वाळत असल्याचे दिसून येते व झाड उपटल्यास सहज जमिनीमधून ते निघून येतं त्यास मूळ नसतात असं

दिसून आल्यास त्या ठिकाणी जमीन उकरून बघावी जमिनीमध्ये हुमनी अळी दिसून येते असं ज्या ठिकाणी आढळून आले असेल त्या शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे उपाय योजना तात्काळ कराव्यात1) मेटारायझियम अनिसोफिली 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून शेतामध्ये ड्रेंचींग (आळवणी) करावी ज्या शेतात ओलावा कमी असेल तिथे स्प्रिंकलरने पाणी देऊन नंतर ड्रेंचींग करावी किंव्हा2) रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनीलीप्रोल 0.4

जी आर (ग्रॅन्युलर फॉर्म) मधील 2 किलो प्रति एकर वापरावे किंव्हा 3) कलोरोपायरीफॉस 10 G ( दाणेदार) 2 किलो प्रति एकर या प्रमाणे उपाययोजना करावी असे मार्गदर्शन कृषि सहायक श्री पवार साहेब यांनी केले.सोयाबीन पिकामध्ये काही ठिकाणी स्पोडोप्टेरा व लष्करी अळी ( तंबाखूची पाने खाणारी अळी)चा प्रादुर्भाव दिसून येत आहे ही अळी ओळखायची झाल्यास सोयाबीनची पाने जाळीदार दिसतात

कीडग्रस्त जाळीदार पानाचे मागे पुष्कळ अळ्या असतात तृतीय अवस्थेपासून अळ्या अलग होऊन सोयाबीनची पाने खातात जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडांना पाने राहत नाही या अळीचे नियंत्रण करण्यासाठी इन्डोक्सीकारब 15.8 एस सी 6.6 मिली किंवा स्पायनवोरम 11.7 एस सी 9 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे मार्गदर्शन श्रीमती गवई मॅडम यांनी केले

तसेच क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना (ऍझाटॅ रेकट्टीन-निंबोळी अर्क) प्रति शेतकरी 500 मिली याप्रमाणे वाटप करण्यात आले सदर शेतीशाळेस अमडापुर चे उपसरपंच अजीस खा गावातील प्रगतशील शेतकरी, पत्रकार बांधव व बहुसंख्य शेतकरी उपास्थित होते.

 

सदर शेतीशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती गवई मॅडम कृषी सहायक अमडापुर यांनी केले.

English Summary: A crop-pest, disease advisory farm school has been completed at Amdapur through the Department of Agriculture
Published on: 16 September 2022, 08:16 IST